• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली – मिरज- कुपवाड शहर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी

Admin by Admin
January 26, 2026
in राजकीय
1 min read
0
सांगली – मिरज- कुपवाड शहर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी यांची रविवारी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत निवड करण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

सांगली महापालिका निवडणुकीत भाजपचे ३९ सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी एका सदस्याची गरज असून दोन सदस्य असलेल्या शिवसेना शिंदे गटाबरोबरच १६ सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात महापौर व उपमहापौर निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली.

या बैठकीत आवटी यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, महापौर पद खुले असल्याने या पदासाठी आवटी यांचे बंधू निरंजन आवटी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता बंधूची गटनेतेपदी निवड झाल्याने त्यांची महापौर पदासाठी दावेदारी निष्प्रभ ठरण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या बैठकीस नवनिर्वाचित नगरसेवक, पालकमंत्री पाटील यांच्यासह माजी पालकमंत्री आ.डॉ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जेष्ठ नेते दिपकबाबा शिंदे, निताताई केळकर, जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार. नितिन शिंदे, पृथ्वीराज पवार, पृथ्वीराज पाटील, रावसाहेब पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, सुरेश आवटी, दिलीप सुर्यवंशी, पांडुरंग कोरे, विशाल पवार, विश्वजीत पाटील, युवामोर्चा शांतीनाथ कर्वे आदी उपस्थित होते .

Previous Post

पोलिस अधिकारी गावडे, शिळीमकर, सावंत, कोरे, धनगर, लांडे यांचा सन्मान..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | माजी आमदारांच्या घरासमोर काळी जादू, बंगाली बाबूसह दोघांची धिंड काढत पोलिसांच्या हवाली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सांगली ब्रेकिंग | माजी आमदारांच्या घरासमोर काळी जादू, बंगाली बाबूसह दोघांची धिंड काढत पोलिसांच्या हवाली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group