खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद होत असून अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार स्पष्ट झाले आहेत. कुपवाडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये असाच प्रकार दिसून आला.
भाजपचे तीन उमेदवार या प्रभागात विजयी झाले, मात्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले प्रकाश ढंग यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे भाजपाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
कुपवाडमधील प्रकाश ढंग विरुद्ध गजानन मगदूम अशी बिग फाईट म्हणून येथील लढतीकडे पाहिले गेले . याठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जोराची लढत झाली. भाजपच्या प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत व प्रकाश पाटील हे तीन उमेदवार विजयी झाले, मात्र याच प्रभागातील ब गटातून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पराभूत झाले. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी पराभूत केले. २०१८ च्या निवडणुकीत मगदुम हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.

