कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गजानन मगदूम यांनी शक्तीप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. महापलिकेचा प्रभाग क्रमाक दोन मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला एकच उमेदवार दिला असून माजी नगरसेवक गजानन मगदूम यांना याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केल्याने त्यांचा संपर्क लोकांशी आहे. समाजसेवेत मगदूम कार्यरत आहेत. क्रीडा,सांस्कृतिक, कार्यात शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ते नेहमी क्रीडा स्पर्धा आयोजित करून नव्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. धार्मिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग लक्षणीय असतो.प्र भाग दोन मधून गजानन मगदूम यांना वाढता पाठिंबा दिसत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे नागरिकांच्यात चर्चा आहे.
यावेळी प्रचार फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे, युवक अध्यक्ष आकाश माने ,कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोतरे, युवक अध्यक्ष दादासाहेब कोळेकर,राम गौन्डाजे,जयपाल कवठेकर, भाऊसाहेब पाटील जयकुमार पाटील,श्रीपाल कोल्हापूरे,नितीन लोकपुरे, देशभूषण कर्नाळे कुलभूषण कर्नाळे, राजू हसुरे, गुंडू हसुरे,पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील,महावीर चिंचवाडे शिवगोंड पाटील,संदीप भोसेकर संतोष पाटील ,सुरेश पाटील,अमोल सुतार,शशिकांत पाटील, गंगाधर पाटील ,बापूसाहेब तोडकर सागर पाटील,बाळासाहेब पाटील नागान,दादासाहेब पाटील, अजिंक्य हजारे,राजू पाटील रुमाले, सी आर पाटील,शंकर पाटील यांच्यासह महिलाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांनी भाजपवर जोरदार टीका करत गजानन मगदूम यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. प्रचार फेरीचा प्रारंभ करते वेळी दर्गा,महादेव मंदिर, मारुती मंदिर,रोहिदास समाज मंदिर जैन मंदिर इथं दर्शन घेऊन प्रचार फेरीला सुरुवात झाली. प्रचार फेरी जैन गल्ली,लिंगायत गल्ली स्वामी गल्ली धनगर गल्ली तराळ गल्ली सिद्धार्थ नगर परिसरात उमेदवार गजानन मगदूम यांनी मतदारांचा आशीर्वाद घेतला.या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला.

