• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अपक्ष उमेदवार डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या प्रचारात मोठा जनसमुदाय, विरोधक धास्तावले.!

Admin by Admin
January 8, 2026
in राजकीय
1 min read
0
अपक्ष उमेदवार डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या प्रचारात मोठा जनसमुदाय, विरोधक धास्तावले.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

प्रभाग क्रमांक ४ (ड) मधील अपक्ष उमेदवार डॉ. महेशकुमार कांबळे यांनी आज इंदिरानगर परिसरात भव्य प्रचार फेरी काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. इंदिरानगर परिसरातील शाहूनगर, शेवकरे प्लॉट तसेच पवनचक्की परिसरातील वस्तीमध्ये काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय दिसल्याने विरोधकांनी मात्र याची धास्ती घेतली आहे.

या प्रचार फेरीदरम्यान डॉ. कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. प्रभागातील पायाभूत सुविधा,नागरी सोयी-सुविधा तसेच प्रस्थापित नगरसेवकांकडून रखडलेल्या कामांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांमुळे नागरिक त्रस्त असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले.

यावेळी बोलताना डॉ. महेश कुमार कांबळे यांनी, “मला एकदा संधी द्या. प्रभागातील कोणतेही काम प्रलंबित राहू देणार नाही. नागरिकांच्या तक्रारी येऊ देणार नाही, ही माझी जबाबदारी असेल,”अशी ठाम आणि सकारात्मक भूमिका मांडली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले. या भव्य प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.

रॅली दरम्यान लिफाफा चिन्हावर मतदान करा, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच डॉ. महेश कुमार कांबळे यांच्या नावाचा जोरदार जयघोष करण्यात आला.प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात एक खंबीर आणि विश्वासार्ह नेतृत्व मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली. संपूर्ण परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही यावेळी बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादावरून यावेळी प्रभाग क्रमांक ४ (ड) मध्ये परिवर्तन निश्चित असून डॉ. महेश कुमार कांबळे यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये विश्वास व्यक्त होत आहे.

Previous Post

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत चक्क ६ पती-पत्नी रिंगणात, निवडणुकीची जोरदार चर्चा!

Next Post

मिरजेत खळबळ | अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार ; सांगली पोलिसांचा मोठा दणका, सर्वत्र जोरदार चर्चा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत खळबळ | अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार ; सांगली पोलिसांचा मोठा दणका, सर्वत्र जोरदार चर्चा..!

मिरजेत खळबळ | अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार ; सांगली पोलिसांचा मोठा दणका, सर्वत्र जोरदार चर्चा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group