• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा

Admin by Admin
January 2, 2026
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्हा मध्यवर्ती बँकेत २१ पदांवर तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य पगारवाढ दिली. बँकेच्या चौकशीत या निर्णयामुळे बँकेला ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळले आहे.या नुकसानीची वसुली तत्कालीन संचालकांकडून करण्यासाठी शासनाने कलम ८८ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हा बँकेच्या संचालकाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम व्याजासह वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच संबंधितांना बँकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येणार आहेत. वसुली पूर्ण झाल्यास, काही आजी व माजी संचालकांना दिलासा मिळेल आणि त्यांच्यावरील चौकशीतील जबाबदारी कमी होऊ शकते. जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध तांत्रिक पदांसाठी २१ कर्मचाऱ्यांची भरती मागील संचालक मंडळाच्या काळात करण्यात आली होती.

संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना पगारवाढ देण्यात आली. नियमबाह्य पगारवाढीमुळे बँकेचे नुकसान झाल्याचे ३५ लाख ८८ हजार रुपयांचे शासकीय लेखा परीक्षणात नमूद करण्यात आले. लेखा परीक्षकांनी नुकसानीची जबाबदारी निश्चित करून संबंधित संचालकांकडून वसुली करण्याची शिफारस केली आहे.

कर्मचारी न्यायालयात

जिल्हा बँकेतील २१ तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरतीचा विषय वादग्रस्त बनला आहे. याप्रकरणात यापूर्वीच बँकेच्या लेखा परीक्षणात टिपणी करण्यात आली आहे. काय कारवाई केली? याचा अहवाल शासन व नाबार्डने बँकेकडे मागितला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना आधीच नोटिसा दिल्या आहेत. या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हा बँकेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

Previous Post

कुपवाड येथील तीन प्रभागातून आठ अपक्ष उमेदवारांची माघार

Next Post

सांगली | भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली,यंदा निवडणुकीत भाजप विरोधी सारे एकवटले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली,यंदा निवडणुकीत भाजप विरोधी सारे एकवटले..!

सांगली | भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिंदेसेनेने कंबर कसली,यंदा निवडणुकीत भाजप विरोधी सारे एकवटले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group