कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या
महापालिकेच्या निवडणुकीसाठी माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी प्रभाग क्रमांक १ प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ८ या तीन प्रभागातून एकूण आठ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. सध्या तिन्ही प्रभागात मिळून १०७ उमेदवार रिंगणात असून आज शुक्रवारी माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विजया यादव व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश अनारसे यांनी दिली.

