• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रवादी- काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेना कमी पडतेय; पक्ष वाढणार कसा..?

Admin by Admin
May 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
राष्ट्रवादी- काँग्रेसचे मंत्री सतत दौऱ्यावर, तुलनेत शिवसेना कमी पडतेय; पक्ष वाढणार कसा..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी / सांगली जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी गोऱ्हे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्वाचे सल्ले दिले आहेत.

माधवनगर रोडवरील शासकीय विश्रामगृहात बुधवारी शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची गोऱ्हे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या आहेत.

यामध्ये शिवसेना सध्या राज्यात सत्तास्थानी असून अनेक महत्त्वाची खातीही पक्षाकडे आहेत. मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडेच आहे. अशा परिस्थितीत सांगलीत प्रत्येक तालुक्यात व शहरात पक्ष वाढायचा असेल तर त्या ठिकाणची लोकांची कामे झाली पाहिजेत.

अनेकदा पदाधिकारी शिवसेनेच्या मंत्र्यांना निवेदन देतात, मात्र त्याची दखल घेतली जात नाही. स्थानिक पातळीवर ही कामे होऊन पक्षाचे अस्तित्व दिसले पाहिजे. राष्ट्रवादी व काँग्रेसचे अनेक मंत्री सतत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. तुलनेने शिवसेना मंत्र्यांचे दौरे होत नाहीत, अशा समस्या यावेळी मांडल्या आहेत.

यावर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या की, स्थानिक पातळीवर लोकांची कामे झालीच पाहिजेत.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अनेक चांगले लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत, त्याचा फायदा पक्षाला होणार. स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामेही व्हायला हवीत, शिवसेनेचे जे मंत्री भेटतील त्यांच्यापर्यंत सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या भावना पोहचवून त्यांना येथील कामे करण्यासाठी आग्रह करेन, असे त्यांनी सांगितले आहे.

Previous Post

मंत्रालय हादरले, मंत्र्याला सांगूनही बिल नाही, ठेकेदाराचा कुटुंबासह आत्महत्येचा प्रयत्न..

Next Post

मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही – प्रा. प्रमोद इनामदार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही – प्रा. प्रमोद इनामदार

मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही - प्रा. प्रमोद इनामदार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group