• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत तुफान हाणामारी, पोलिसांनी केला लाठीमार, चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.! तणावाचे वातावरण.?

Admin by Admin
October 25, 2025
in क्राईम
1 min read
0
सांगलीत दादागिरी फक्त आमचीच चालणार..’आम्ही दादा आहोत’ म्हणत केले कोयत्याने वार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेत गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मोटार मागे घेताना ‘बाजूला व्हा’, असे म्हटल्याने दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एक तरुण जखमी झाला. यावेळी दोन्ही बाजूचा जमाव समोरासमोर आल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. याप्रकरणी दोन्ही गटातील १४ जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवार पेठेतील तहसीलदार गल्लीत मंगळवारी रात्री आसिफ तहसीलदार हा मोटार मागे घेत होता. यावेळी तेथे थांबलेल्या संदीप शिंदे व त्याच्या साथीदारांना त्याने ‘बाजूला व्हा’ असे म्हटल्याच्या कारणावरून वादावादी व हाणामारी झाली. आसिफ यास मारहाणीमुळे तणाव निर्माण होऊन दोन्ही गटांचे समर्थक एकत्रित झाले. मोटारचालक असिफ तहसीलदार यास मारहाण झाल्याने आसिफ व त्याचे साथीदार श्रेयस याच्या घरात घुसले. तेथे श्रेयस याच्या आईला धक्काबुक्की व अन्य उपस्थित महिलांना शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किरण चौगले फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पिटाळून लावले. दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यासमोरही मोठी गर्दी जमली होती. याबाबत शोएब बद्रेमुनीर तहसीलदार यांनी संदीप शिंदे, नायकवडी, पवार, पवारचा मित्र कदम व इतर चार ते पाच जणांनी मोटार मागे घेताना ‘बाजूला व्हा’ असे म्हटल्याच्या कारणावरून भाऊ आसिफ तहसीलदार यास लोखंडी गजाने डाव्या पायावर मारून जखमी केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप शिंदे, पवार व नायकवडी या तिघांना अटक केली आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | भाजपचे उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर, मग ठरवू..! चंद्रकांतदादांमुळे नेते गोंधळात..?

Next Post

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शनिवारी २५ ऑक्टोबरला जत तालुक्यातून हजारो शेतकरी बांधवांनी घेरडीला यावे – काशिनाथ शेवते, प्रदेशाध्यक्ष – रासप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शनिवारी २५ ऑक्टोबरला जत तालुक्यातून हजारो शेतकरी बांधवांनी घेरडीला यावे – काशिनाथ शेवते, प्रदेशाध्यक्ष – रासप

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शनिवारी २५ ऑक्टोबरला जत तालुक्यातून हजारो शेतकरी बांधवांनी घेरडीला यावे - काशिनाथ शेवते, प्रदेशाध्यक्ष - रासप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group