• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महिलेचा विनयभंग व पतीला जीवे मारण्याची धमकी

Admin by Admin
October 16, 2025
in क्राईम
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगांव मध्ये एकावर गुन्हा दाखल

कडेगांव येथील एका हॉटेल चालवणाऱ्या महिलेस ओळखीचा फायदा घेऊन ती बेसावध असताना तिला पाठीमागून येऊन मिठी मारत तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तसेच पीडितेस सदर बाब कोणास सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी हिंगणगाव खुर्द येथील हेमंत संपत डोंबाळे याच्यावर कडेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, पीडित व त्यांच्या पतीचे कडेगांव येथे हॉटेल आहे. याठिकाणी सदरचे हॉटेल हे भाडे तत्वावर चालवत असुन पीडितेच्या हॉटेल मध्ये विश्वराज संभाजी जाधव रा हिंगणगाव खुर्द ता कडेगाव हे ग्राहक म्हणुन येत होते. त्याच्यांशी पीडितेची चांगली ओळख झाली होती. काही महिण्यापुर्वी त्यांनी त्यांचा मित्र हॉटेल मध्ये नाष्टा करण्याकरीता घेवुन आले. त्यांनी त्यांची ओळख हेमंत संपत डोंबाळे रा हिंगणगाव खुर्द अशी ओळख करुन दिली. त्यानंतर ते हॉटेल मध्ये नेहमी येत जात असत त्याच्यांशी पीडितेची चांगली ओळख झाली होती.

दि 18 जुलै 2025 रोजी रात्री 9.30 वा चे सुमारास पीडिता हॉटेल मध्ये काम करीत असताना अचानक कोणीतरी पाठी मागुन येवुन पीडितेला मिठी मारली पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अचानक मिठी मारल्याने पीडितेने घाबरुन मागे वळुन पाहीले असता सदरची व्यक्ती हेमंत संपत डोंबाळे ही व्यक्ती असल्याचे दिसले. त्यावेळी पीडितेने त्याला धक्का देवुन पळुन जाणेचा प्रयत्न केला असता त्यांने, हे जर कोणाला सांगितले तर तुझ्या नव-याला जिवंत सोडणार नाही तुझे हॉटेल जाळून टाकीन अशी धमकी देवुन निघुन गेला आहे. तरी सदर झाले प्रकाराबाबत पीडितेने घाबरुन समाजात बेअब्रु होईल या भितीने तक्रार देणे टाळले मात्र पतीशी चर्चा करुन तक्रार देणेस पोलीस ठाणेस आले असे नमूद केले आहे.

पीडितेच्या तक्रारी नुसार संबंधितावर भारतीय न्याय संहिता 74, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आशिष जाधव करीत आहेत.

Previous Post

संजयकाका पाटील अन् विलासराव जगताप यांच्यात मनोमिलन.? भाजपला रोखण्याचा नवा डाव..!

Next Post

मिरजेत मुलीच्या अपहरण प्रकरणी ताब्यात असलेल्या संशयिताने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन काढला पळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत मुलीच्या अपहरण प्रकरणी ताब्यात असलेल्या संशयिताने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन काढला पळ..!

मिरजेत मुलीच्या अपहरण प्रकरणी ताब्यात असलेल्या संशयिताने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन काढला पळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group