• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सातारा | महिला पोलीस अधिकाऱ्याच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…

Admin by Admin
May 12, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सातारा | महिला पोलीस अधिकाऱ्याच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा -सासरच्या लोकांकडून विवाहितेच्या छळाचे गुन्हे अजूनही घडत असतानाच, कायदा राबवणाऱ्या पोलीस दलातील महिलाही यातून सुटल्या नाहीत. पोलीस उपनिरीक्षक असलेल्या महिलेच्या मुलाच्या वाढदिनीच सासरकडील काही मंडळींनी तिचा गळा दाबला.

त्या महिला अधिकाऱ्याकडून तब्बल दहा लाख रुपये घेऊन सासूच्या नावावर जमीन करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना चिंचणी, ता. सातारा येथे घडली.

याप्रकरणी पती प्रशांत शिवाजी शिंदे, सासू मंगल (रा. चिंचणी), नणंद हेमा, तिचा पती गणेश भोसले (रा. सैदापूर रोड, मोळाचा ओढा, सातारा), नणंद दीपाली व तिचा पती गणेश जाधव (रा. वल्लभनगर, पिंपरी-चिंचवड, पुणे) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 31 वर्षीय महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की, 2014 पासून आजपर्यंत सासरच्या मंडळींनी आपला मानसिक व शारीरिक छळ केला. पती प्रशांत, सासू मंगल व नणंद हेमा यांनी 2014 व 2019 मध्ये आपल्या इच्छेविरुद्ध दोनदा गर्भपात केला. मुलाच्या वाढदिवसाला नणंद हेमा व दीपाली यांनी आपला गळा दाबला. तुझ्या नावावर जमीन घ्यायची आहे. त्यासाठी स्टेट बॅंकेतून आठ लाख 20 हजार रुपये कर्ज काढायला पती प्रशांत याने सांगितले. या कर्जाची रक्‍कम आणि प्रशिक्षण काळातील 15 महिन्यांचा पगार मिळून दहा लाख रुपये सासू व पती यांच्या बॅंक खात्यावर जमा करून घेतले; परंतु जमीन सासूच्या नावावर करून आपली फसवणूक केली.

Previous Post

सातारा : जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची साखरपेरण

Next Post

आमदार जयकुमार गोरेंनी केली दोनदा फसवणुक ..? जनतेच्या नजरेत पुढची निवडणूक..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार जयकुमार गोरेंनी केली दोनदा फसवणुक ..? जनतेच्या नजरेत पुढची निवडणूक..!

आमदार जयकुमार गोरेंनी केली दोनदा फसवणुक ..? जनतेच्या नजरेत पुढची निवडणूक..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group