• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दादागिरी फक्त आमचीच चालणार..’आम्ही दादा आहोत’ म्हणत केले कोयत्याने वार..!

Admin by Admin
June 28, 2025
in क्राईम
1 min read
0
सांगलीत दादागिरी फक्त आमचीच चालणार..’आम्ही दादा आहोत’ म्हणत केले कोयत्याने वार..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

‘आम्ही येथील दादा आहे, उद्या हद्दपार सुनावणीच्या केसमध्ये तारीख आहे. तू तक्रार मागे घे’, अशी दमदाटी करीत सराईत गुन्हेगारासह दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना संजयनगर परिसरातील जगदाळे प्लॉट व उर्मिलानगर येथे घडली. आफ्रिद सिकंदर आनंदपुरे (वय 20, रा. आलिशान कॉलनी, कुपवाड) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल आहे.

अमन ख्वाजा मोकाशी, फातिमा ख्वाजा मोकाशी (दोघे रा. उर्मिलानगर, बावडेकर कॉम्प्लेक्समागे, सांगली), शाहिद इरफान खान (रा. मंगळवार बाजार, नेहरूनगर, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. यातील संशयित अमन मोकाशी याच्याविरोधात पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. फिर्यादी आफ्रिद हा जगदाळे प्लॉट येथील रामजानकी मंदिराच्यामागे रस्त्यावरून जात असताना संशयित अमन व शाहिद हे दोघे दुचाकीवरून तिथे आले. दोघांनी आफ्रिदला अडवून ‘तू व इकलास मुलाणी या दोघांनी माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का दिली?, आमची इथे दहशत आहे. हद्दपारीच्या सुनावणीवेळी तक्रार मागे घ्यायची’, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने आफ्रिदच्या डाव्या हाताच्या कोपर्‍यावर दोन वार केले. शाहिद यानेही शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

या घटनेनंतर आफ्रिदला दोघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून उर्मिलानगरमध्ये आणले. तिथे फातिमा यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास व त्याच्याकडील पैसे काढून घेण्यास चिथावणी दिली. त्यानंतर दोन्ही संशयितांनी पुन्हा आफ्रिदला मारहाण करून खिशातील दोन हजार काढून घेतले. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास, तुला व इकलास याला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Previous Post

विशाल पाटील कसे विजयी झाले हे जाहीरपणे सांगू शकत नाही : चंद्रकांत पाटील

Next Post

बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर

बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group