• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली मिरजेतील नागरिकांच्यात भितीचे वातावरण, ‘या’ कडे प्रशासनाचे दुर्लक्ष…. म्हणून दिसेल तिथे ‘हेच’ सुरू आहे..

Admin by Admin
May 12, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगली मिरजेतील नागरिकांच्यात भितीचे वातावरण, ‘या’ कडे प्रशासनाचे दुर्लक्ष…. म्हणून दिसेल तिथे ‘हेच’ सुरू आहे..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विजयनगर येथील हॉटेल सिलेब्रेशनच्या दारात पार्किंग केलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्याने 14 लाख 81 हजारांचे 37 तोळे दागिने असलेली पर्स पळविली. मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी सिद्धेश विजय माने (रा. बी वॉर्ड, ताराराणी कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, की माने हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीच्या मावस भावाचे मंगळवारी लग्न होते. त्यामुळे माने दाम्पत्य लग्नासाठी आले होते. सायंकाळी माने हे मिरज एमआयडीसी रस्त्यावरील सासूरवाडीत आले. रात्री ते विजयनगरला हॉटेल सिलेब्रेशनमध्ये जेवणासाठी आले.

त्यावेळी दागिन्याची पर्स कारमध्ये (एमएच 09 इयू 8325) सीटवर ठेवून दरवाजा लॉक केला होता. चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून आतील पर्स लांबविली. त्यामध्ये दहा तोळ्यांचे गंठण, पाच तोळ्यांचा नेकलेस, दहा तोळ्यांचे दोन तोडे, दहा तोळ्यांच्या चार बांगड्या, दोन तोळ्यांची कर्णफुले, चांदीच्या खड्याचे मंगळसुत्र असा 14 लाख 81 हजार 500 रुपयांचा ऐवज होता.

जेवण झाल्यानंतर माने कारजवळ आले. तेव्हा त्यांना कारची काच फोडल्याचे दिसले. तेव्हा आतील सीटवर ठेवलेली पर्स लांबविल्याचे लक्षात आले. माने यांनी विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

चोर्‍या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगमध्ये वाढ

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोर्‍या, घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Previous Post

‘मुख्यमंत्री हे चिल्लरवाला गडी आहे’; उद्धव ठाकरे व अजितदादा पवार यांच्या बाबतीत सदाभाऊ खोतांची जीभ घसरली…

Next Post

मिरज : हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक ; सराईत गुन्हेगारास अटक ..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज : हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक ; सराईत गुन्हेगारास अटक ..

मिरज : हरिप्रिया एक्स्प्रेसवर दगडफेक ; सराईत गुन्हेगारास अटक ..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group