• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले

Admin by Admin
June 16, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी आज, सोमवारी भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे.

ADVT.

सोमवारी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, सी.बी. पाटील आदींनी जयश्रीताई पाटील यांची निवासस्थानी भेट दिली. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला.

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.

महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

Previous Post

ब्रेकिंग | मिरजेतील वेश्याअड्ड्यावर छापा

Next Post

पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार

पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे; मग ३ लाख मोजा; आरोग्य विभागातील धक्कादायक प्रकार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group