• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली पोलीस दलातील ‘या’ चार पोलिसांची खातेनिहाय चौकशी होणार .!

Admin by Admin
June 9, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली पोलिस दलामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस व सन्मानपत्र देत गौरव करण्यात येतो. बऱ्यापैकी सर्वच पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना गुन्ह्यांची उकल करण्यात किंवा दरोडा, खून यासारख्या प्रकरणात योग्य तपास करीत आरोपी पकडण्यात यश मिळाल्याने त्यांचा सन्मान झाल्याचे पाहिले आहे. परंतु, पोलिस अधीक्षकांनी निष्काळजी पणाने आरोपी हातातून निसटलेल्या पोलिसांची आता चौकशी लावलीय.

इस्लामपूर येथील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्याला अवघ्या तासात इस्लामपूरच्या पथकाने पुन्हा जेरबंद केले. मात्र, यातील निष्काळजीपणा करणाऱ्या चौघा अंमलदारांची खातेनिहाय चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

अधिक माहिती अशी, दागिने चोरण्याच्या हेतूने मुवाज ईलाही मुलाणी (रा. इस्लामपूर) याने वृद्धेचा खून केला होता. खुनाच्या घटनेत कोणतेही पुरावे हाती नसताना पोलिसांनी शिताफीने त्याला गजाआड केले. त्याच्या अन्य कारणास्तव शुक्रवारी (ता. ६) न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयित मुलाणी याला येथील मध्यवर्ती कारागृहात सोडण्यात इस्लामपूर ठाण्याचे चार अंमलदार आले होते.

दरम्यान, कारागृहाच्या दारातच मुलाणी याने पोलिसांच्या हातावर तुरी देत मिरजेच्या दिशेने धूम ठोकली. क्षणात घडलेल्या या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली. संशयिताने मिरज रेल्वेस्थानक गाठल्यानंतर गावातील एकास फोन करत मर्दुमकी दाखवली आणि तेथेच तो फसला. ही टीप पोलिसांना मिळाल्यानंतर इस्लामपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय हरूगडे यांच्यासह पथक दाखल झाले.

तो मिरजेतील रेल्वेत बसला असताना त्याला पुन्हा शिताफीने ताब्यात घेतले. तो संशयित पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र, एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ने-आण करताना होणाऱ्या निष्काळजीपणावर जोरदार चर्चा झाली. अधीक्षक घुगे यांनाही गांभीर्याने दखल घेतल संबंधित चार अंमलदारांची आता खातेनिहाय चौकशी होणार असल्याचे समजते आहे.

Previous Post

ब्रेकिंग ! मुंबईत दोन फास्ट लोकलचा अपघात, सहा जणांचा मृत्यू

Next Post

मिरजेच्या महिला तहसीलदारांवर जयहिंद सेनाप्रमुख चंदन चव्हाण यांची आगपाखड, २४ रोजी बोंबाबोंब आंदोलन..! वाचा सविस्तर..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेच्या महिला तहसीलदारांवर जयहिंद सेनाप्रमुख चंदन चव्हाण यांची आगपाखड, २४ रोजी बोंबाबोंब आंदोलन..! वाचा सविस्तर..

मिरजेच्या महिला तहसीलदारांवर जयहिंद सेनाप्रमुख चंदन चव्हाण यांची आगपाखड, २४ रोजी बोंबाबोंब आंदोलन..! वाचा सविस्तर..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group