• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | मिरजेत गोरक्षकांनी वाहन पकडले, तब्बल ४२ वासरांची वाहतूक करणाऱ्यास अटक, २ वासरांचा मृत्यू..!

वासरांची वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे - हिंदू रक्षा समिती व धर्मगुरू दशनाम गोस्वामी गोरक्षक आखाड्याचे प्रमुख सत्यमूर्ती महाराजांची मागणी

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | मिरजेत गोरक्षकांनी वाहन पकडले, तब्बल ४२ वासरांची वाहतूक करणाऱ्यास अटक, २ वासरांचा मृत्यू..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज पंढरपूर रोडवर ४२ गाईच्या वासरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारी पिकअप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पहाटे पकडली आहे. यामध्ये गाईच्या वासरांना तोंड बांधून, दाटीवाटीने नेणाऱ्या एकाला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सदर वाहतुकीवेळी २ वासरे ही मृतपावली असल्याचे निदर्शनास आले. त्यातील एका वासराला वाहतुकीच्या दरम्यान मारण्यात आल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आगामी बकरी ईदच्या निमित्ताने गाईची अथवा गाईच्या वासरांची कत्तल होऊ नये, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या गाई आणि वासरांच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना खास बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, एक जण गाईच्या वासरांची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.

ADVT.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंढरपूर रस्त्यावर सदरची पिकअप पकडली. पिकअपमध्ये गाईची वासरे दाटीवाटीने तोंड बांधून,निर्दयपणे वाहतूक करताना आढळली. त्यानुसार वाहन गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडून मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिली. सदरचे वाहन आणि गाईची वासरे ही मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली. चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत संबंधित पिकअप चालक आणि संबधीत एकावर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गाई तसेच गाईच्या वासरांची कत्तल होऊ नये, यासाठी सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी गस्त घालून गाईची आणि वासरांची कत्तलीसाठी होणारी वाहतूक थांबवावी, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे मिरज शहर प्रमुख विनायक माईंनकर यांनी केले आहे.याबाबतची माहिती शुक्रवारी पहाटे ६ वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून देण्यात आली आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर! अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती, ना वेतन

Next Post

मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?

मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप - काँग्रेस गटांत वादावादी..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group