• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

माहेरहून दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसह, मुलगी झाल्याच्या रागातून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विवाहितेने पती, सासू, सासरा, दीर, आणि चार नणंदा यांच्याविरोधात मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आठजणांवर गुन्हा दाखल आहे. सलमा तौफिक मुल्ला (वय 35, रा. स्टेट बँकेजवळ, शिरोळ) यांनी फिर्याद दिली.

ADVT.

पीडिता सलमा यांचा मिरजेतील सुंदरनगर भागात राहणार्‍या तौफिक मीरासाहेब मुल्ला याच्याशी 2016 साली झाला होता. विवाहाचा संपूर्ण खर्च पीडितेच्या वडिलांनी केला होता. लग्नात तेरा तोळे सोनेही घातले होते. काही दिवसांनी पीडितेची सासू दिलशाद मुल्ला हिने किरकोळ घरगुती कारणातून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

नणंद रेश्मा मिरासाब मुल्ला (रा. इचलकरंजी), अफसाना आसिफ जमादार (रा. कोल्हापूर), आयेशा रिजवान मुतवल्ली (रा. मिरज) आणि आफ्रिन सनी शेख (रा. शिरोळ) यांनी याप्रकरणी मदत केली. सासरा मीरासाहेब मुल्ला (रा. मळणगाव), सासू दिलशाद आणि दीर इमरान यांनीही मानसिक त्रास दिला. विवाहितेला मुलगी झाल्यावर पती तौफिकसह सासरची सर्वच मंडळी नाराज झाली. बाळंतपणाचा खर्च, तसेच कारसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला. तसेच पुन्हा मुलगी जन्माला आली.

ADVT.

त्यानंतर सासरच्या मंडळींनी पतीचे दुसरे लग्न करून देण्याची धमकी दिली. माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांत पती, सासू, सासरा, दीर आणि चार नणंदांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVT.
Previous Post

नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर

Next Post

सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर! अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती, ना वेतन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर! अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती, ना वेतन

सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ वाऱ्यावर! अडीच महिन्यांपासून ना नियुक्ती, ना वेतन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group