Sunday, June 1, 2025
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तब्बल ५४ वर्षांनंतर केला मोठा बदल, रेल्वे प्रवासी जाम खुश

Admin by Admin
May 27, 2025
in विशेष, सामाजिक
0
महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तब्बल ५४ वर्षांनंतर केला मोठा बदल, रेल्वे प्रवासी जाम खुश
5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

हरिप्रिया, महालक्ष्मी एक्सप्रेस पाठोपाठ वजनाला हलके, जास्त आसन क्षमता आणि स्वच्छ स्वच्छतागृहांच्या एलएचबी कोचच्या सुविधांचा लाभ आता महाराष्ट्र एक्सप्रेसचे प्रवासी १ जून पासून घेणार आहेत.या गाडीला १८ नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.

भारतीय रेल्वेने सर्व आयसीएफ कोच हटवून त्याऐवजी एलएचबी कोच वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

राज्यातील सर्वाधिक लांब अंतर धावणारी ही गाडी रोज कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून (ट्रेन क्रमांक ११०३९) १८ एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे तर गोंदिया-कोल्हापूर एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक ११०४०) ३ जूनपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून एलएचबी कोच आणि नवीन संरचनेसह धावणार आहे. तब्बल ५४ वर्षानंतर हा बदल होत आहे.

१ नोव्हेंबर १९७१ : कोल्हापूर-गोंदिया मार्गावर पहिला प्रवास

१२ जिल्ह्यांतून प्रवास : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा

१३४१ किलोमीटरचा मार्ग

२७ तास ४५ मिनिटे : प्रवासाचा वेळ
११० किलोमीटर ताशी वेग
२.४५ वाजता : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सवरून मार्गस्थ
६ वाजता : दुसऱ्या दिवशी गोंदिया गंतव्य स्थानावर पोहोचते
६२ स्थानकांवर थांबा

  • अशी असेल संरचना

१ द्वितीय वातानुकुलित कोच
४ तृतीय वातानुकुलित कोच
७ शयनयान कोच
४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
१ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
१ जनरेटर कार

हे आहेत थांबे

छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, वळिवडे, रुकडी, हातकणंगले,जयसिंगपूर, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, भवानीनगर, कराड, मसूर, तारगाव, रहिमतपूर, कोरेगाव, सातारा, जरंडेश्वर, वाठार, लोणंद, निरा, जेजुरी, आंबले, घोरपडी, पुणे, उरळी, कोडगाव, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, पुणतांबा, कोपरगाव, येवला, मनमाड, नंदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, तुळजापूर, शिंदी, अंजनी, नागपूर, इतवारी, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, तिरोडा, गोंदिया

नव्या कोचचे वैशिष्ट्य
वजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता, स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले हे नवीन एलएचबी कोच लावल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे. या गाडीतील सर्वच्या सर्व जुने रॅक बदलण्यात येणार असून ते आधुनिक लिंक हाफमन बूश डब्यांमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत. या बदलामुळे पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी, सुरक्षित, सुखकर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

लिंके-हॉफमन-बुश कोचचे वैशिष्ट्य

लिंके-हॉफमन-बुश (एलएचबी) कोच हे भारतीय रेल्वेचे प्रवासी डबे आहेत, जे जर्मनीतील लिंके-हॉफमन-बुश या कंपनीने विकसित केले आहेत आणि भारतातील कपूरथला, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्समध्ये तयार केले जातात.

हे कोच २००० पासून भारतीय रेल्वेच्या १६७६ मिमी (५ फूट ६ इंच) ब्रॉड गेज नेटवर्कवर वापरले जात आहेत. सुरुवातीला, शताब्दी एक्स्प्रेससाठी जर्मनीहून २४ वातानुकूलित कोच आयात करण्यात आले होते. त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर रेल कोच फॅक्टरीने देशांतर्गत उत्पादन सुरू केले.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
Previous Post

संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित, यंत्रणा सज्ज..!

Next Post

मंत्र्याचं पोर, समाजाला घोर; महाराष्ट्रातील कोणत्या ५ मंत्र्यांच्या औलादींनी तुडवला कायदा?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्र्याचं पोर, समाजाला घोर; महाराष्ट्रातील कोणत्या ५ मंत्र्यांच्या औलादींनी तुडवला कायदा?

मंत्र्याचं पोर, समाजाला घोर; महाराष्ट्रातील कोणत्या ५ मंत्र्यांच्या औलादींनी तुडवला कायदा?

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

ताज्या बातम्या

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विवाहितेला तिच्या मुलासह सांभाळण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार...

लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार

विश्रामबाग, सांगलीवाडीत घरफोडी

by Admin
June 1, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरात बंद फ्लॅट, घर फोडून चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे....

मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

सांगलीत खळबळ, बीड पॅटर्नने सांगली हादरली; सपरंच देशमुखांप्रमाणेच युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण

by Admin
May 31, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा खोक्याभाईची दहशत आणि इतर प्रकरणात अपहरण आणि...

मिरज ब्रेकिंग | मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्या उद्घाटन

मिरज ब्रेकिंग | मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्या उद्घाटन

by Admin
May 31, 2025
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या समाज कल्याण विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या...

नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

by Admin
May 31, 2025
0

दारूबंदी ठराव फक्त कागदावरच ;लखन सकट यांनी केली पोलखोल खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  गावातील ग्रामसभेत घेतलं जाणारे ठराव फक्त...

मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?

मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?

by Admin
May 30, 2025
0

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरजेत महात्मा गांधी चौकात वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजपचा आवटी...

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group