• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“साल्यांनो…तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत.!”

Admin by Admin
May 11, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
“साल्यांनो…तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत.!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : खबऱ्या प्रतिनिधी ; “तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत.तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या आणि साल्यांनो आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत.”; कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या कवितेतल्या काही ओळींचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा जातीवादी मुद्द्यात हात घातल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि. ९ मे) सातारा येथे भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था आयोजित ‘पुरस्कार वितरण सोहळा व भव्य महिला मेळावा’ या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेसुद्धा उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, “मी पूर्वी जेव्हा औरंगाबादला जायचो तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये उपेक्षित समजातली काही मुलं तिथे शिकायची. शैक्षणिक पार्श्वभूमी नसूनही ही मुलं उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड नावाचा एक कवी त्याकाळी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये शिकवायचा. त्याने त्याच्या कवितेत असं म्हटलंय की, ‘आम्ही आमच्या चीनी हाथोड्यापासून बनवलेल्या जात्यामुळे आज अनेकांचं पोट भरत आहे. या सोबतच आम्ही अनेक गोष्टी बनवल्या. तुम्ही ज्यांची पूजा करता ते ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही आमच्या चीनी हातोड्यापासून घडवल्या. त्या तुम्ही मंदिरात ठेवल्या आणि आता आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही.'”. पवारांच्या या उदाहरणावरून त्यांनी पुन्हा एकदा जातीवादी मुद्द्यात हात घातल्याचे स्पष्ट होत आहे.

“पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!”, असे ट्वीट करत भाजपने पवारांवर हल्लाबोल चढवला आहे.

Previous Post

शिक्षणाधिकारी, अधिक्षकांवर होणार कारवाई ; लाच प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर…

Next Post

प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group