• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत खळबळ | सिव्हिल हॉस्पिटलमधून ३ दिवसांच्या बाळाची चोरी, कुचकामी सुरक्षायंत्रणा..?

Admin by Admin
May 3, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत खळबळ | सिव्हिल हॉस्पिटलमधून ३ दिवसांच्या बाळाची चोरी, कुचकामी सुरक्षायंत्रणा..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा भेदून संबंधित महिलेने बाळ चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच आक्रमक झालेल्या आलदर कुटुंबाने मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक आता बाळ चोरून नेलेल्या महिलेच्या मागावर रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मात्र मिरजेत एकच खळबळ उडाली आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/05/VID-20250503-WA2284.mp4

सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील कविता समाधान आलदर यांची मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती.

त्यांना मुलगा झाला होता. आज (दि.३) सकाळी ११ वाजता कविता आलदर या बाळाला जवळ घेऊन रुग्णालयात झोपल्या होत्या.

यावेळी संशयित महिला त्याठिकाणी आली. तिने बाळाला डोस द्यायचे असल्याचे सांगून कविता आलदर यांच्यापासून बाळ घेऊन गेली. परंतु तासभर झाला तरी संबंधित महिला बाळाला घेऊन न आल्यामुळे आलदर कुटुंबाने बाळाची शोधा शोध सुरू केली. यावेळी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता एका संशयित महिलेने बाळाला रुग्णालयातून बाहेर घेऊन गेल्याचे चित्रीकरण झाले आहे. तसेच संबंधित महिला गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात रेकी करत असल्याचे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

Previous Post

धक्कादायक ब्रेकिंग! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Next Post

सांगली ब्रेकिंग | जेवणातून गुंगींचे औषध दिलं, सततच्या भांडणाला वैतागलेल्या आई – बहिणीने डोक्यात दगड घालून केला खून..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | जेवणातून गुंगींचे औषध दिलं, सततच्या भांडणाला वैतागलेल्या आई – बहिणीने डोक्यात दगड घालून केला खून..!

सांगली ब्रेकिंग | जेवणातून गुंगींचे औषध दिलं, सततच्या भांडणाला वैतागलेल्या आई - बहिणीने डोक्यात दगड घालून केला खून..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group