• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालकपदाचा प्रवीण टाके यांनी स्विकारला पदभार

Admin by Admin
April 24, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालकपदाचा प्रवीण टाके यांनी स्विकारला पदभार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी श्री.प्रवीण टाके यांनी आज कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे त्यांनी पदभार स्विकारुन कामकाजाबाबत आढावा घेतला.याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उपसंपादक रणजित पवार, सहाय्यक अधीक्षक रवींद्र चव्हाण, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड म्हणून कार्यरत असलेले प्रवीण टाके यांचाही समावेश आहे.

यापूर्वी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झाल्या नंतर नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना लोकराज्यचे कार्यकारी संपादक म्हणून तर चंद्रपूर व नागपूर या दोन ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्य केले आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना व लोकमत या दैनिकांमध्ये पत्रकारिता केली आहे.

Previous Post

दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदार विशाल पाटील यांनी घेतला आढावा

Next Post

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत पीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत पीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत पीक पध्दती, पाण्याचे नियोजनाबाबत चर्चासत्र संपन्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group