• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या अप्पर तहसील कार्यालयामार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप

Admin by Admin
April 17, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
सांगलीच्या अप्पर तहसील कार्यालयामार्फत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मुख्यमंत्री कार्यालयाकडून राबवण्यात येणाऱ्या १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत शासकीय कामकाज गतिमान व्हावे यासाठी सुरू असलेल्या अभियानांतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि अप्पर तहसील कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप करण्यात आले.

यावेळी अप्पर तहसील कार्यालयामार्फत अनाधिकृत वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती केलेल्या कारवाईमध्ये अंदाजे ९ ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. महानगरपालिकेमार्फत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप देण्याची मागणी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने अप्पर तहसील कार्यालयामार्फत आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे व उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसील कार्यालय, सांगली यांचेकडून तीन घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास वाळू गुरुवारी मोफत देण्यात आली.

यावेळी अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, नायब तहसीलदार मनोहर पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी सुधाकर जाधव, चंदनशिवे, ग्राम महसूल अधिकारी अश्फाक मुनावर, सागर शिंदे ,समाजविकास तज्ञ मनपा सांगली, विहांग वाघमारे सिव्हिल इंजिनियर राजेंद्र गोंधळे स्वच्छता निरीक्षक, अभिषेक सुर्यवंशी व घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत आम्हाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहे. या बांधकामासाठी आम्हाला तहसील कार्यालयामार्फत मोफत वाळू उपलब्ध होत आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो – घरकुल लाभार्थी

Previous Post

मोठी बातमी | सांगलीचे नवे आयुक्त सत्यम गांधींचा आदेश : दहा दिवसांत यादी तयार करा..! नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर..!

Next Post

सांगली | नॅशनल हेराल्ड प्रकरण : केंद्र, ईडी विरोधात सांगली काँग्रेसची जोरदार निदर्शने..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | नॅशनल हेराल्ड प्रकरण : केंद्र, ईडी विरोधात सांगली काँग्रेसची जोरदार निदर्शने..

सांगली | नॅशनल हेराल्ड प्रकरण : केंद्र, ईडी विरोधात सांगली काँग्रेसची जोरदार निदर्शने..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group