• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | ४० हजारांची लाच घेणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला अटक

Admin by Admin
April 17, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | ४० हजारांची लाच घेणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी |गोपनीय खबऱ्या

बचतगटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याबद्दल ४० हजार रूपयांची लाच घेतल्याबद्दल समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उषा संपत उबाळे (वय ४६, रा. खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली. मूळ रा.साखरवाडी, ता. फलटण) याला अटक केली. सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उबाळे याच्या कक्षात ही कारवाई केली.

तक्रारदार यांचा बचतगट आहे. या बचतगटाने समाज कल्याण विभागाकडील एक टेंडर घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर केल्याबद्दल सहायक आयुक्त उबाळे याने तक्रारदार यांच्याकडे १० टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि. १६ रोजी तक्रार अर्ज दिला.

तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांच्या बचतगटाचे ८ लाख १२ हजार रूपये बिल मंजूर केल्याबद्दल दहा टक्केप्रमाणे लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून पाच टक्के प्रमाणे ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. तसेच उबाळे याने लाचेची रक्कम दि. १७ रोजी घेऊन येण्यास सांगितले.

गुरूवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त उबाळे याच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रूपये लाच स्विकारल्यानंतर उबाळे याला अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर उबाळे याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

सांगली | अवैध धंदेवाल्यांना हवाय आमदारांचा वरदहस्त.?

Next Post

मोठी बातमी | सांगलीचे नवे आयुक्त सत्यम गांधींचा आदेश : दहा दिवसांत यादी तयार करा..! नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

मोठी बातमी | सांगलीचे नवे आयुक्त सत्यम गांधींचा आदेश : दहा दिवसांत यादी तयार करा..! नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group