• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | करगणीतील दूध भेसळीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Admin by Admin
March 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

आटपाडी तालुक्यातील करगणी येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत दुधामध्ये भेसळ करण्याकरिता साठविलेली डेअरी परमिएट पावडर (25 कि. ग्रॅ. चे एक बॅग व 19 कि. ग्रॅ. खुली पावडर) आढळून आली. ही माहिती अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

या कारवाईत करगणी येथील सचिन वसंत सरगर यांच्या राहत्या घरी तपासणी केली असता तेथे दुधामध्ये भेसळ करण्याकरिता साठविलेली डेअरी परमिएट पावडर (25 कि. ग्रॅ. चे एक बॅग व 19 कि. ग्रॅ खुली पावडर) आढळून आली. सदर दूध व डेअरी परमिएट पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरिता घेऊन उर्वरित 4 हजार 800 रूपये किंमतीचा 150 ‍लि. दुधाचा साठा जागीच नष्ट करण्यात आला व उर्वरित डेअरी परमिएट पावडरचा 6 हजार 364 रूपये किंमतीचा 43 कि. ग्रॅ. साठा जप्त करुन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी ताब्यात घेतला. अन्न नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. अन्न व औषध प्रशासन, सांगली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. व्ही. हिरेमठ यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

अन्न भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सांगली कार्यालयाशी 0233-2602202 या दूरध्वनी क्रमांक किंवा राज्यस्तरीय टोल फ्री क्र. 1800222365 वर संपर्क करुन माहिती द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | जादूटोण्याचा भयंकर प्रकार; दारात बांधले बकऱ्याचे मुंडके, लिंबू, काट्याची फांजर, हळदी-कुंकू, नारळाची पूजा

Next Post

सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना, वांगीतील ९ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण आले समोर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना, वांगीतील ९ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण आले समोर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group