• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज-पुणे रेल्वेमार्ग चार तास ठप्प..!

Admin by Admin
March 8, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज-पुणे रेल्वेमार्ग चार तास ठप्प..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज रेल्वे जंक्शनजवळ इंधन वाहून नेणारी रिकामी वॅगन शुक्रवारी दुपारी रुळावरून घसरली. मुख्य रेल्वे मार्गावरच हा अपघात झाल्यामुळे मिरज ते पुणे रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक चार तास ठप्प होती.

रुळावरून घसरलेली वॅगन बाजूला करून सायंकाळी या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

मिरज रेल्वे स्थानकातून पुण्याच्या दिशेने इंधन वाहून नेणारी रिकामी वॅगन निघाली होती. मिरज जंक्शनमधून ही वॅगन वाहेर पडल्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुख्य मार्गावरून जात असताना रेल्वे रुळावरून ही वॅगन घसरली. रेल्वे रुळावरून वॅगन घसरून देखील इंजिन पायलटला याची कल्पना नव्हती. यावेळी इंजिन मेन्टेनन्स इंजिनिअर साळुंखे या रेल्वे कर्मचार्‍याच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने लाईनमनला याबाबत सूचना केली. त्यानंतर तातडीने सिग्नल देऊन रेल्वे थांबविण्यात आली.

दरम्यान, घसरलेल्या स्थानकापासून तशीच वॅगन पुढे गेल्याने रेल्वे इंधन वॅगन आणि रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले. इंधन वॅगनची चाके तुटून दुसर्‍या बाजूला झाली. अपघाताची माहिती मिळताच सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मुख्य रेल्वे मार्गाचे नुकसान झाल्याने मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे चार तास ठप्प होती. त्यामुळे कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मिरज रेल्वे जंक्शनवर, तर सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस सांगली स्थानकात थांबविण्यात आली होती.

  • संबंधित वॅगनला गार्डच नव्हता?

मिरजेतून पुण्याकडे निघालेल्या रिकाम्या इंधन वॅगनला गार्डच नसल्याचे सांगण्यात आले. गार्ड नसल्यामुळे वॅगन रुळावरून घसरल्याची कल्पनाच पायलटल आली नव्हती. रेल्वे कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Previous Post

मिरजेत सहाय्यक प्राध्यापकाने संपविले जीवन

Next Post

तासगाव-सांगली मार्गावर अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगाव-सांगली मार्गावर अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

तासगाव-सांगली मार्गावर अपघात; दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group