Saturday, June 7, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | पोलिसाकडून सरपंच राजेश पडळकर यांना मारहाण; कवठेमहांकाळ ठाण्यातील प्रकार

Admin by Admin
March 8, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

 

कवठेमहांकाळ प्रतिनिधी : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीमंत करे यांनी रायवाडीचे सरपंच राजेश पडळकर यांना नाहक अमानुषपणे मारहाण केली. करे यांना तत्काळ निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन सरपंच संघटनेने पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना दिले.

मारहाणीची सखोल चौकशी करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

सरपंच संघटनेचे नेते प्रदीप माने व तालुकाध्यक्ष अरुण भोसले यांच्या यांच्या नेतृत्वाखाली तहसील व पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला आणि माने तसेच भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळ पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील यांना भेटून करे यांच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. अमर शिंदे, नामदेव पाटील, प्रवीण पवार, तानाजी शिंद, यांनी शासकीय शासकीय कार्यालय मध्ये सरपंचांना अपमानास्पद वागणूक मिळते, याबाबत वरिष्ठांनी दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी केली.

पोलीस कर्मचारी श्रीमंत करे व सहकारी यांचे सात दिवसांच्या आत निलंबन करावे, अन्यथा सरपंच व पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करतील. असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी तानाजी यमगर, संपत नरळे, नितीन कांबळे, तुकाराम शिंदे, सहदेव गुरव, दीपक कांबळे, गोरख खोत, शिवदास भोसले यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

६ मार्चरोजी रायवाडी गावचे सरपंच राजेश काशिनाथ पडळकर हे त्यांच्या कामानिमित्त पंचायत समिती येथे आले होते. यावेळी त्यांना फोन करून श्रीमंत करे यांनी पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. आणि पडळकर यांना धमकावत तुला ३०७ या केस मध्ये अडकवतो. नाही तर तुला यातून बाहेर पडायचे असेल, तर २ लाख दे, अशी मागणी केली.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | बायकोच्या कृत्यामुळे स्वतःला पेटवून घेत ‘तो’ पोलीस ठाण्यात धावत आला, म्हणाला… वाचवा वाचवा 

Next Post

मिरजेत सहाय्यक प्राध्यापकाने संपविले जीवन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत सहाय्यक प्राध्यापकाने संपविले जीवन

मिरजेत सहाय्यक प्राध्यापकाने संपविले जीवन

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014