• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘देखो भाई, वो ठीक नही है, अभी.’ अमित शहांनी शिंदेंना स्पष्टच सांगितले, बैठकीचा खळबळजनक तपशील समोर..!

Admin by Admin
March 2, 2025
in मंत्रालय, राजकीय
1 min read
0
‘देखो भाई, वो ठीक नही है, अभी.’ अमित शहांनी शिंदेंना स्पष्टच सांगितले, बैठकीचा खळबळजनक तपशील समोर..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गृहमंत्री अमित शहा हे फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पहाटे चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली होती. यावेळी सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही.

माझे निर्णय फिरवले जातात, अशी खदखद शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली, असा दावा ‘सामना’ रोखठोकमधून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व्हायचे, तर पक्षाला भाजपात विलीन करा, असे अमित शहा यांनी शिंदे यांना सांगितले, असेही रोखठोकमध्ये म्हणण्यात आले आहे.

  • रोखठोकमध्ये काय म्हटले?

एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ‘वेस्टइन’ हॉटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता. “सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत”, असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले. “बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा” हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत. शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता.

  • अमित शहा अन् शिंदेंमध्ये काय चर्चा झाली?

अमित शहा – क्या शिंदेजी, सुबह के चार बज रहे है, इतना क्या अर्जंट है?
शिंदे – आपको सब मालूम है, यहा क्या हो रहा है.
शहा – क्या हो रहा है?
शिंदे – माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत.
शहा – ऐसा कैसा हो सकता है? मै देवेंद्र से बात करता हूं.
शिंदे – मुझे दबाने की, खतम करने की पुरी कोशिश हो रही है. आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका वादा था, चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहुंगा.
शहा – हमारे 125 लोग चुनकर आये… तो आप कैसा क्लेम कर सकते हो?
शिंदे – मेरे नेतृत्व में चुनाव हुवा.
शहा – नहीं, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुवा. आप को क्या चाहिये बोलो… मै कोशिश करूंगा.
शिंदे – मुख्यमंत्री.
शहा – देखो भाई, वो ठीक नही है. अभी नही हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.
शिंदे – मै क्या करूं?
शहा – आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नही बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है।
शिंदे – फिर हमारे पार्टी का क्या?

यावर, ‘वो हमारे पे छोड दो. वो पार्टी हमनेही बनायी. आप चिंता मत करो,’ असे शहा यांनी सांगितले आणि पहाटेची बैठक संपवली, असे सांगणारे भाजपचेच लोक आहेत,” असा दावा रोखठोखमधून करण्यात आला आहे.

Previous Post

ब्रेकींग – कवठेमहांकाळ हादरले..| ४० वर्षीय बाईने विम्याच्या पैशासाठी केला नवऱ्याचा खून..!

Next Post

बालविवाह प्रकरणी ‘हे’ आयपीएस अधिकारी अडचणीत

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बालविवाह प्रकरणी ‘हे’ आयपीएस अधिकारी अडचणीत

बालविवाह प्रकरणी 'हे' आयपीएस अधिकारी अडचणीत

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group