• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दत्ता गाडेच्या बायकोचा खळबळजनक दावा; ती म्हणाली. मला पण न्याय पाहिजे

Admin by Admin
March 2, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दत्ता गाडेच्या बायकोचा खळबळजनक दावा; ती म्हणाली. मला पण न्याय पाहिजे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयाने दत्ता गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.त्याची सध्या कसून चौकशी सुरु आहे. आरोपी दत्ता गाडेवर विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे.

  • दत्ता गाडेची पत्नी काय म्हणाली?

मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय. बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे.

त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत असा दावा देखील दत्ताच्या पत्नीने केला आहे. तरुणीने आरडाओरड का केली नाही? असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरु आहे. या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

  • आरोपीच्या वकिलांचा खळबळजनक खुलासा

स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती. गाडे याने कोणतीही जबरदस्ती केलेली नसून, पीडित तरुणी स्वतः त्याच्या सोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये जाण्याआधी तरुणीने ७५०० रुपये घेतले होते.

एवढेच नव्हे, तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीने वकिलांना दिली आहे. तसेच दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला आणि त्यानंतर तरुणीने दत्ता गाडेवर आरोप लावले. त्यामुळे हे प्रकरण जबरदस्तीचे नसून आर्थिक कारणावरून उभे करण्यात आले आहे, असं वकिलांचे म्हणणे आहे.

Previous Post

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा

Next Post

ब्रेकींग – कवठेमहांकाळ हादरले..| ४० वर्षीय बाईने विम्याच्या पैशासाठी केला नवऱ्याचा खून..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकींग – कवठेमहांकाळ हादरले..| ४० वर्षीय बाईने विम्याच्या पैशासाठी केला नवऱ्याचा खून..!

ब्रेकींग - कवठेमहांकाळ हादरले..| ४० वर्षीय बाईने विम्याच्या पैशासाठी केला नवऱ्याचा खून..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group