• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगलीत हिंदू एकता आंदोलन आक्रमक, केली ही’ मागणी 

Admin by Admin
February 12, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | सांगलीत हिंदू एकता आंदोलन आक्रमक, केली ही’ मागणी 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : ‘शहरातील त्रिमूर्ती चौकातील हत्तीच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी संशयिताला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी हिंदू एकता आंदोलनतर्फे करण्यात आली.

त्रिमूर्ती चौकाचे सुशोभीकरण करून तेथे बबलू हत्तीची फायबरची सात फूट उंचीची प्रतिकृती उभारली होती. त्याची परिसरातील नागरिक मनोभावे पूजा करत. लहान मुलांचे आकर्षण होते. महिन्यापूर्वी हनुमान नगरमध्ये राहणाऱ्या एकाने रात्रीच्या सुमारास प्रतिकृतीची मोडतोड केली. हत्तीचा कान मोडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित मोडतोड करताना दिसत आहे.

चौकाचे ज्यांनी सुशोभीकरण केले, ते रवींद्र केंपवाडे विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता तक्रार दाखल करून घेतली गेली नाही. शाखा अभियंत्यांच्या तक्रारीनुसार किरकोळ स्वरुपाची कारवाई करून संशयिताला सोडून देण्यात आले.

हत्तीच्या प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा. त्याने अन्यत्र अशा प्रकारचे कोणते कृत्य केले आहे का, याचीही चौकशी करावी.

अन्यथा संशयिताच्या घरावर ‘हिंदू एकता आंदोलन’ मोर्चा काढेल, असा इशारा शहर-जिल्हाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णू पाटील, प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंखे, रवी वादवणे, अविनाश मोहिते, उदय मुळे यांनी दिला.

Previous Post

सख्या बहिणींनी रचला इतिहास पोलिस खात्यात दोघींची निवड

Next Post

पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा, जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा, जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी

पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा, जिल्ह्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group