• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण, शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी , अन्यथा….!

Admin by Admin
May 5, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण, शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी , अन्यथा….!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

चौगुले म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील दंग्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही आधारविना प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचा आरोप केला. चौकशी आयोगासमोर ज्यावेळी लेखी म्हणणे मांडण्याची वेळ आली त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी यासंर्भात काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. राज्यातील दलित समाजांमध्ये यामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले. राज्यभर दंगली घडविण्याचे कारस्थान यामागे होते. यात राज्यातील काही संघटनांचा समावेश आहे.

तर राज्यभर मोर्चा

शासनाने व पोलिसांनी आता या प्रकरणातील खऱ्या सुत्रधारांना शोधावे. जोपर्यंत त्यांना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान लढत राहणार. सुरुवातीला निवेदने देण्यात येतील. त्यानंतरही कारवाई झाली नाही, तर राज्यभर मोर्चा काढण्यात येतील, असा इशारा चौगुले यांनी दिला.

‘या’ अधिकाऱ्यांना शांततेचे श्रेय

ते म्हणाले की, तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलीसप्रमुख सुहैल शर्मा व अन्य अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच दलित संघटनांची एकत्रित बैठक घेतल्यामुळे सांगलीत शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनाही शांततेचे श्रेय जाते. घटनेनंतर लगेचच उदयनराजे यांनी आम्हाला पाठींबा दिला होता. सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठींबा दर्शवून विश्वास व्यक्त केला होता.

पुणे पोलिसांचे आभार

चौगुले म्हणले की, पुणे पोलिसांनी प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणाने तपास केल्याने सत्य बाहेर आले. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आता सुत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी, ही अपेक्षा आहे.

Previous Post

राज ठाकरेंच्या आंदोलनाचा फटका, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील भोंगेही उतरणार

Next Post

संभाजी भिडेंना व्यक्तिशः ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
संभाजी भिडेंना व्यक्तिशः ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले..!

संभाजी भिडेंना व्यक्तिशः ओळखत नाही, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group