• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Jayant Patil : ‘जयंत पाटील नीच अन् कपटी माणूस, टप्प्यात आणून कार्यक्रम..’; भाजप नेत्याची जहरी टीका.

Admin by Admin
February 8, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई खास प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी टीका केली. जयंत पाटील हा नीच आणि कपटी माणूस आहे. ते टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, पण जयंत पाटील (Jayant Patil) आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय, असं पडळकर म्हणाले.

कवठेमहांकाळमध्ये बहुजन समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात पडळकर बोलत होते. पडळकर म्हणाले की, जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे, म्हणून ते कधी समाधानी नसतात. मी जत मतदारसंघातून निवडून येऊ नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण जतच्या लोकांना कळतंय कोणाला घरी घालवायचे. तुम्ही सांगायची गरज नाही. जयंत पाटील हे टप्प्यात आणून कार्यक्रम करतात, असं मला एक जण म्हणाला. पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतोय, असं पडळकर म्हणाले.

  • Jayant Patil विधान परिषदेवेळी माझा अर्जबाद करा म्हणाले

पडळकर म्हणाले की, जयंत पाटील यांच्यावर मी बोलतोय म्हणता तुम्ही. पण ते मला किती विरोध करत असतात. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी मला विरोध केला. निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला. तुम्ही खोटी माहिती दिली आहे, अर्ज बाद करा, असं पाटील यांनी सांगितल्याचं पडळकर म्हणाले. आपला मुलगा आमदार व्हावा, यासाठी इचलकरंची लोकसभा मतदारसंघात त्यांनी चाचपणी केल्याचं पडळकर म्हणाले.

Jayant Patil जयंत पाटील भाजपच्या संपर्कात

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहाला भेट देणार आहे. त्यामुळं जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, आगामी काळात जयंत पाटील भाजपसोबत जातात की, राष्ट्रवादीतच राहतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Previous Post

अजब कारभार! वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांंचीच गाडी जप्त; पोलिसांची कारवाई

Next Post

ब्रेकिंग | एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

ब्रेकिंग | एमडी ड्रग्जसाठी वापरलेला कच्चा माल जप्त, तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group