• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | महायुतीची मुंबईतील बैठक अचानक रद्द; शिंदे साताराकडे रवाना!

Admin by Admin
November 29, 2024
in सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | महायुतीची मुंबईतील बैठक अचानक रद्द; शिंदे साताराकडे रवाना!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • – एकनाथ शिंदेंना भाजपकडून उपमुख्यमंत्री, केंद्रात मंत्रिपदाची ऑफर!
  • – मुख्यमंत्रीपदावर आता १ डिसेंबरलाच होणार निर्णय

मुंबई (प्राची कुलकर्णी) खास प्रतिनिधी – सत्तास्थापनेसाठी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले असले तरी, महायुतीत सद्या सर्व काही ऑलवेल नसल्याचे चित्र पुढे आले आहे. काल अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती, पण तीही अचानक रद्द करून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा येथे आपली शेती पाहण्यासाठी निघून गेले आहेत.

दरम्यान, शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपद देण्याची ऑफर दिली असून, त्यांनी ठेवलेले प्रस्ताव भाजपने नाकारले आहेत. त्यामुळे शिंदे नाराज असल्याने, आता पुढील निर्णय १ डिसेंबरच्या मुंबईतील बैठकीतच होईल, अशी शक्यता महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने औपचारिक संवादातून व्यक्त केली आहे.

भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची १ डिसेंबरला मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला नवी दिल्लीतून पक्षाचे दोन निरीक्षक येणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त मराठा नेतृत्वाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकते, अशी शक्यता आहे. ही बैठक संपल्यानंतर आणि भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे नाव पुढे आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचेही राजकीय सूत्रांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला हव्या असलेल्या मंत्रिपदाची यादी व संबंधित नेत्यांची नावे काल रात्रीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपावलेली आहे. त्यामुळे या खात्यांवर आणि संबंधितांच्या नावावर निर्णय घेण्याची वेळ भाजपच्या हायकमांडची आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला असून, केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्यासही ते तयार नसल्याचे कळते आहे.

त्यामुळे आजच्या महायुतीच्या बैठकीला हजर न राहता ते सातारा येथे घरी निघून गेले. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना ही बैठकच रद्द करावी लागली. आता सोमवारी महायुतीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमित शाहांच्या उपस्थितीत अडिच तास बैठक तरी मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय नाही!

Previous Post

मोठी ब्रेकिंग | तर ..१००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील..!

Next Post

गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही एसटी बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group