आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 22 उमेदवारांचे नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरवण्यात आले आहे.
पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिली आणि दुसरी यादी मिळून एकूण 121 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गोपीचंद पडळकरांना जतमधून तिकीट देण्यात आले आहे, तर देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
- आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत… भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे
1. पुणे छावणी – सुनील कांबळे
2. कसबा – हेमंत रासने
3. लातूर ग्रामीण – रमेश कराड ‘
4. उल्हासनगर – कुमार आयलानी
5. शिराळा – सत्यजित देशमुख
6. धुळे ग्रामीण – राम भदाणे
7. मलकापूर – चैनसुख संचेती
8. अकोला पश्चिम – विजय अग्रवाल
9. ब्रह्मपुरी – कृष्णलाल सहारे
10. वाशिम – श्याम खोडे
11. खडकवासला – भीमराव तापकीर
12. जत – गोपीचंद पडळकर
13. अकोट – प्रकाश भारसाखले
14. मेलघाट – केवलराम काळे
15. नाशिक मध्य – देवयानी फरांदे
16. पंढरपूर – समाधान आवताडे
17. वरोरा – करण देवतळे
18. विक्रमगड – हरिश्चंद्र भोये
19. सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे
20. राजुरा – देवराव भोंगळे
21. गडचिरोली – मिलिंद नरोटे
22. पेन – रवींद्र पाटील .

