• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत कोयत्याने वार करून कबड्डीपटूची हत्या..! पाच अल्पवयीन आरोपी ताब्यात.

Admin by Admin
August 28, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत कोयत्याने वार करून कबड्डीपटूची हत्या..! पाच अल्पवयीन आरोपी ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli Crime news : सांगली जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका चांगल्या कबडीपटू तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगलीतील जामवाडी मधील मरगुबाई मंदिराजवळ घडली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढं आलंन आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच अल्पवयीन आरोपींना अटक केली आहे.

अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २२, रा. जामवाडी,सांगली) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिकेत हा एक कबड्डीपटू होता. तसेच तो एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून देखील काम करत होता. तो त्याच्या घराजवळील जामवाडी येथील सार्वजनिक मंडळातही सक्रिय होता.

काय आहे प्रकरण ?

अनिकेतचा काही महिन्यापूर्वी हनुमान जयंतीच्या दिवशी काही मुलांसोबत वाद हाल होता. या वादातून त्याने एका मुलाला कानशिलात मारली होती. याचा राग या मुलांना होता. मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अनिकेत घरातून जीमला जाण्यासाठी घराबाहेर पडला. घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेले चार ते पाच मुले त्याच्याजवळ आली. त्यांनी त्याला हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या वादावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, आरोपींनी त्यांच्या सोबत आणलेल्या कोयत्यांनी त्याच्यावर जोरदार वार करण्यास सुरुवात केली. यातील एक घाव त्याच्या डोक्यात तर काही घाव हे पाठीत बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Previous Post

ब्रेकिंग | माजी पोलिस महासंचालक संजय पांडेंविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल, आणखी सहा जणांचा समावेश..!

Next Post

महाराष्ट्र हादरला : तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून हत्या..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

महाराष्ट्र हादरला : तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून हत्या..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group