मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | महाराष्ट्र महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने कामगार मेळावा तसेच राज्यातील घरेलू कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज सकाळी ११:३० वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे होणार आहे.
या कार्यक्रमास इतर मान्यवर लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर यांनी दिली.

