• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील ३० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Admin by Admin
August 13, 2024
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – खबऱ्या प्रतिनिधी | राज्यातील पोलीस अधिक्षक, पोलीस उपायुक्त आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या 30 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आज, मंगळवारी (13 ऑगस्ट) राज्याचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी अंतर्गत बदल्याचे आदेश जारी केले आहे.

त्यात तीन पोलीस उपायुक्तांची बदली मुंबई शहरात दाखविण्यात आली असून या अधिकार्‍यांमध्ये ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली धाटे, नागपूरचे उपायुक्त विजयकांत सागर यांच्यासह बदलीच्या प्रतिक्षेत असलेले मनिष कलवानिया यांचा समावेश आहे.

आज गृहविभागाने 30 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्याचे आदेश जारी केले होते. त्यात पालघर आणि रायगडचे अनुक्रमे अप्पर पोलीस अधिक्षक पंकज नवनाथ शिरसाट आणि अतुल उत्तम झेंडे यांची ठाणे शहर पोलीस उपायुक्त, ठाण्याच्या पोलीस उपायुक्त रुपाली खैरमोडे (अंबुरे) यांची ठाणे सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक सुखदेव नरळे यांची पालघर अप्पर पोलीस अधिक्षक, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक अभिजीत सुरेश शिवथरे यांची रायगड अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली.

नागपूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहुल अरविंदराव माकणीकर यांची नागपूर पोलीस उपायुक्त, नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांची महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली राजेंद्र धाटे, साताराचे पोलीस अधिक्षक समीर अस्लम शेख व नागपूरचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्त, सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य चैशाली ईश्‍वर कडूकर यांची सातारा अप्पर पोलीस अधिक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे पोलीस अधिक्षक सुरज पांडुरंग गुरव यांची नांदेडच्या अप्पर पोलीस अधिक्षक, धाराशीवचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर बी पाठारे यांची सातारा पोलीस अधिक्षक, नागपूरचे पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांची वर्धा पोलीस अधिक्षक, नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस अधिक्षक विश्‍व पानसरे यांची बुलढाणा पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीषष सरदेशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बारामतीचे अप्पर पोलीस अधिक्षक संजय वाय जाधव यांची धाराशीवच्या पोलीस अधिक्षक, गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधिक्षक कुमार चिता यांची यवतमाळच्या पोलीस अधिक्षक, साताराचे अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांची पुण्याच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक, नंदूरबारचे अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांची नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, यवतमाळचे पोलीस अधिक्षक पवन बनसोड यांची अमरावती राज्य गुन्हे शाखेच्या पोलीस अधिक्षक, वर्धाचे पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांची नवी मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा येथे नियुक्त करण्यात आली.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांची पुण्याच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या पोलीस अधिक्षक/दक्षता अधिकारी, पुण्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पोलीस अधिक्षक/दक्षता अधिकारी दिगंबर प्रधान यांची नागपूरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक, गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी सुहास त्र्यबंक शिंदे यांची पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक तसेच बदलीच्या प्रतिक्षेत असलेले श्रीकृष्ण कोकाटे यांची हिंगाली पोलीस अधिक्षक, नंदकुमार ठाकूर यांची दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, मनिष कलवानिया यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त, अपर्णा गिते यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी कार्यकारी संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Previous Post

काँग्रेसमध्ये आई, मुलगी राष्ट्रवादीत…! सांगलीत रंगली जोरदार चर्चा..?

Next Post

पंढरीचा विठुराया तिरंग्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पंढरीचा विठुराया तिरंग्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट..

पंढरीचा विठुराया तिरंग्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group