• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | सांगली पोलिस मुख्यालयात घुसून चोरी; तीन महिला अटकेत.

Admin by Admin
June 6, 2024
in शोध पत्रकारिता
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली विश्रामबाग येथे शेकडो पोलिसांचा राबता असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस परिवहन विभागात घुसून चोरी करण्याचे धाडस तीन महिलांनी केले. या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सांगली पोलिस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस पोलिसांचा मोटार वाहन विभाग आहे. या विभागाच्या मागील बाजूस रेल्वे लाईन आहे. मोटार वाहन परिवहन विभागाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आवारात जुनी वाहने लावण्यात आली होती. या ठिकाणी घुसून संशयित तीन महिला मोटार वाहन विभागाजवळ आल्या. त्यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून वाहनांचे सुटे भाग काढून घेतले. सुटे भाग काढून घेतल्यानंतर त्या पळून जात होत्या. तेवढ्यात पोलिसांनी हा प्रकार पाहिला.

पोलिसांनी ओरडल्यानंतर महिला पळून जाण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र पोलिसांनी पाठलाग करून गीता अनिल कुंचिकोरवी (रा. सुभाषनगर, मिरज), सुनीता भारत पवार (रा. वडर कॉलनी, वांगीकर प्लॉट, सांगली) आणि राधा मार्तंड माळी (रा. वांगीकर प्लॉट, वडर कॉलनी, सांगली) या तीन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलांकडे वाहनांच्या सीट, टायर मॅगवेल, पेट्रोलची टाकी, ॲल्युमिनिअमची तार असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Next Post

NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे,वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे,वाचा सविस्तर..!

NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे,वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group