• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दरोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश

तीन आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी 

Admin by Admin
May 27, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दरोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्या पथकाची कारवाई 

मिरज तालुक्यातील कळंबी जवळ पेट्रोल पंपावर देवदर्शनासाठी निघालेल्या चार चाकीत असलेल्या कुटुंबावर अज्ञातांकडून दरोडा घालण्यात आला होता. या दरोड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी आरोपी तरबेज चार्शिटया शिंदे, रंजीत भोसले, सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दिनांक 24 मे 2024 रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कळंबी जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी चार चाकी मधील प्रवाशी थांबले. त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले. त्यानंतर त्या ठिकाणी आठ ते दहा जणांनी येऊन त्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. या दरोड्यात सोने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. फिर्यादी पती आणि पत्नीला दरोडेखोरांकडून चाकूने वार करण्यात आले. या बाबात मिरज ग्रामीण पोलिसात अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी आरोपी तरबेज चार्शिटया शिंदे, रंजीत भोसले, सुरेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिकारी रणजित तिप्पे, विक्रम पाटील, पंकज पवार, उप निरीक्षक गुरव, रवींद्र भापकर, पांडुरंग मुंडे, हेमंत ओमसे, शशिकांत जाधव, सचिन मोरे, विकास भोसले, संग्राम पाटील, सुनील देशमुख, प्रदीप कुंभार, वसंत कांबळे, सुहास कुंभार, संजय कांबळे यांच्या सह मिरज उपविभागीय पोलीस विभाग आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या पथकांनी संयुक्त कारवाई केली आहे

Previous Post

BIG BREAKING | फिर से खेला होबे! 4 जूननंतर पुन्हा राजकीय भूकंप, शरद पवार गट आणि ठाकरेंचा गट फुटणार – मोहित कंबोज काय म्हणाले.. वाचा सविस्तर

Next Post

सांगली ब्रेकिंग | ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सांगली ब्रेकिंग | ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group