• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नची तुफान चर्चा; पक्षीय पाश झुगारुन सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार…

Admin by Admin
May 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली लोकसभेत मिरज पॅटर्नची तुफान चर्चा; पक्षीय पाश झुगारुन सर्वपक्षीय नगरसेवकांकडून विशाल पाटलांचा प्रचार…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या सांगली मतदारसंघात मतदान जसजसे जवळ येत आहे, तसतसे एक वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. सांगलीच्या राजकारणात सध्या अस्तित्त्वात आलेल्या मिरज पॅटर्नची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

कारण, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी सांगलीतील सर्वपक्षीय नगरसेवक एकटवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील नगरसेवकांनी विशाल पाटील यांना जाहीरपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. हे पाऊल उचलताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पक्षीय पाश झुगारुन टाकले आहेत.

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि आरपीआयच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या या मिरज पॅटर्नची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत विशाल पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक असणारे नगरसेवकही या पॅटर्नमध्ये सहभागी झाले आहेत. भाजप पक्षाच्याही अनेक नगरसेवकांनी ही संजय काका पाटील यांना विरोध करत विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत. पक्षाच्या कारवाईला न जुमानता विशाल पाटील यांचा प्रचार करणार असल्याची ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे आता भाजप, शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सांगली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, ही जागा काँग्रेसची असल्याचे सांगत विशाल पाटील यांनी याठिकाणी शड्डू ठोकला होता. काँग्रेसच्या नेत्यांनी मनधरणी करुनही विशाल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माघार घेतली नाही. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता सांगलीत विशाल पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसत आहे.

कोणत्या नगरसेवकांचा विशाल पाटलांना पाठिंबा?

* मैनुद्दीन बागवान- राष्ट्रवादी, शरद पवार गट, माजी महापौर

* आझम काझी- राष्ट्रवादी

* चंद्रकांत हुलवान- राष्ट्रवादी

* नर्गिस सय्यद- राष्ट्रवादी

* शिवाजी दुर्वे- भाजप

* आनंदा देवमाने- भाजपा

* निरंजन आवटी – भाजप

* संदीप आवटी – भाजप

* संजय मेंढे- काँग्रेस

* बबीता मेंढे- काँग्रेस

* करण जामदार- काँग्रेस

* वहिदा नायकवाडी- काँग्रेस

Previous Post

भाजपकडून अल्पसंख्यांकांना विश्वास देण्याचे काम

Next Post

बिग ब्रेकिंग | शरद पवारांचे सर्व दौरे अचानक रद्द, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवार यांची अचानक प्रकृती बिघडली

बिग ब्रेकिंग | शरद पवारांचे सर्व दौरे अचानक रद्द, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group