• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूंकपाचे केंद्र..!

Admin by Admin
March 27, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
Big Breaking | विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी ‘हे’ मुंबईत.! अंतिम निर्णय आज दिल्लीत..? काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे अतिक्रमण..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे ठाकरेंसोबत असलेल्या पाचही खासदारांना त्यात स्थान मिळाले.

निष्ठावंतांना संधी मिळाली. नवीन चेहरेही त्यामुळे शिवसेनेला मिळाले. पण दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या जखमांवर मात्र मीठ चोळण्याचे काम या यादीने केले आहे. ही जखम इतकी तीव्र आहे की महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काॅंग्रेस हे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. असे कोठे घडेल हे तुमच्या लक्षात आले असेलच. ही जागा म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ. याशिवाय वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. त्यातून काॅंग्रेसचे नेते संजय निरूपम हे नाराज झाले आहेत. ते काॅंग्रेस सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे सेनेच्या मशालीची धग काॅंग्रेसला दोन मतदारसंघात बसली आहे. निरूपम यांची सोडचिठ्ठी काॅंग्रेससाठी महत्वाची नसेल. पण सांगलीच्या जागेवर काॅंग्रेसचे स्थानिक नेते तडजोडीच्या तयारीत नाहीत.

या सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिवसेनेने या यादीमार्फत शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर सभेतून घोषित झाली. तेव्हाच काॅंग्रेसला धक्का बसला होता. तरीही काॅंग्रेस नेत्यांनी धीर सोडला नव्हता. या जागेसाठी अजूनही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिवसेनेने अधिकृत यादीतही पाटलांचे नाव ठेवल्याने काॅंग्रेससाठी हा धक्का आहे.

सांगलीच्या जागेवर तिढा असताना ही उमेदवारी जाहीर केलीच कशी असा सवाल काँग्रेस नेत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, विक्रम सावंत, काँग्रेसचे सांगली मतदारसंघाचे इच्छुक विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत.

काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदार झिशान सिद्दकी यांना या निमित्ताने स्वपक्षावर टीका करण्याची संधी मिळाली. ठाकरे गटाला त्यांनी लक्ष्य केले. “शिवसेनेने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करणे यावरुन दिसून येते की मित्र पक्ष म्हणून काँग्रेसला ते किती महत्त्व देतात आणि त्यांचा किती आदर करतात? शिवसेनेच्या विरोधात बोलल्याबद्दल माझ्यावर टीका होत आहे पण एक दिवस लोकांना कळेल की ही युती महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचेच नुकसान करते आहे,“ अशा शब्दांत सिद्दीकींनी सुनावले आहे.

सांगलीच्या बाबतीत शिवसेनेचा युक्तिवादही तगडा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरची जागा ही परंपेरने शिवसेनेकडे होती. ही जागा शिवसेनेने कोणतीही खळखळ न करता छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडली. शाहू महाराजांनी आपण काॅग्रेसच्या चिन्हावरच उमेदवारी लढणार असल्याची अट घातली होती. त्यामुळे शिवसेनेचा नाईलाज झाला. शिवसेनेची दुसरी जागा म्हणजे हातकणंगले. हा मतदारसंघ राजू शेट्टी यांना सोडण्याची तयारी महाविकास आघाडीने ठेवली आहे. त्यामुळे येथेही ठाकरे गटाचे मशाल चिन्ह दिसणार नाही. मग पश्चिम महाराष्ट्रात एक तरी जागा मशालीसाठी मिळणे ठाकरे यांना आवश्यक वाटले. त्यामुळे त्यांनी सांगलीची जागा ही काॅंग्रेसकडून हिसकावून घेतली.

हे वरच्या पातळीवरचे राजकारण असले तरी सांगली जिल्ह्यात काॅंग्रेसची मोठी ताकद आहे. या जिल्ह्यात पहिल्यांदाच वसंतदादा पाटील घराणे आणि विश्वजित कदम हे एकत्र आले आहेत. पाटील घराण्याला गेली दहा वर्षे राजकीय घरघर लागली आहे. त्यातून काॅंग्रेसचे मोठे नुकसान झाले. ही चूक आता लक्षात आल्याने या घराण्याला पुन्हा राजकीय संजीवनी देण्याची तयारी काॅंग्रेसने केली होती. त्यातून विशाल पाटील यांची उमेदवारी पक्षाने निश्चित केली होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात सारेच गणित फिसकटले. काॅंग्रेसच्या तुलनेत या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नगण्य आहे. तरीही ही जागा सेनेकडे गेल्याने काॅंग्रेस कार्यकर्ते संतप्त होणे स्वाभाविक आहे. त्यातून आता सांगलीत वेगळीच समीकरणे आकारास येऊ शकतात. शिवसेनेची यादी जाहीर झाल्यानंतर विश्वजित कदम यांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे. ही जागा सोडवून आणण्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. तरीही उद्धव ठाकरे गांधी यांचे ऐकतील का हा प्रश्नच आहे. या साऱ्या वादात महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो, इतका हा वाद टोकाचा आहे.

वेळ पडली तर सांगलीत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तेथील जिल्हा काॅंग्रेस समिती देखील बरखास्त करून सारे नेते हे विशाल पाटलांच्या प्रचारात उतरण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाने कोणावर कारवाई करण्याचाही प्रश्न उपस्थित राहणार नाही. नाही मशाल, फक्त विशाल, अशा घोषणा आता काॅंग्रेस कार्यकर्ते देत आहेत. सांगलीत विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिले तर महाविकास आघाडीला तडे बसण्याचाही धोका आहे. मग शिवसेनेचे कार्यकर्तेही इतर मतदारसंघात काॅंग्रेस उमेदवारांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळेच सांगलीचा तिढा हा महाविकास आघाडीत ठसठसणारी जखम बनला आहे. त्यावर वेळीच मलमपट्टी करण्याची गरज आहे.

Previous Post

ब्रेकिंग | वंचितला पाठिंबा दिलेला नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला

Next Post

मोठी ब्रेकिंग | मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली : काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली : काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

मोठी ब्रेकिंग | मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली : काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group