• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पेपर अवघड गेल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, गडहिंग्लजमधील धक्कादायक घटना

Admin by Admin
March 19, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Kolhapur News Student End Life – विवेक घुगरे (विशेष प्रतिनिधी) खबऱ्या ऑनलाईन – राज्यात दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. अनेक विद्यार्थी पेपर सोपे गेल्यामुळे खुश आहेत, तर अनेक विद्यार्थी थोडेसे तणावात देखील आहेत. याच तणावातून अनेकदा विद्यार्थी नैराश्यात जातात. बऱ्याचदा ते टोकाचं पाऊल उचलतात, अशीच एक घटना कोल्हापूरच्या गडहिंग्लजमधून समोर आली आहे.

दहावीचे आतापर्यंत झालेले पेपर अवघड गेल्यामुळे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम लक्ष्मण कोळी (वय १६, रा. स्वामी कॉलनी, गडहिंग्लज, मूळ गाव हेब्बाळ), असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या विद्यार्थ्याने घरामध्ये फॅनला गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आली आहे.

सत्यमचे वडील खासगी नोकरी करतात. लक्ष्मण कोळी यांचा सत्यम हा गडहिंग्लजमध्ये एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर त्याला पेपर अवघड जात होते. असं तो त्याच्या घरच्यांना सांगतही होता. याच तणावातून त्याने सोमवारी (१८ मार्च) सकाळी ९ च्या सुमारास त्याच्या बेडरूममध्ये फॅनला गळफास घेतला.

सत्यमने आत्महत्या केल्याचं निदर्शनास येताच घरच्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केलं. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच सत्यमचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दहावीचे पेपर अवघड गेल्यामुळे सत्यमने जीवन संपवले आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्याला पेपर अवघड जात असल्याचं सत्यमने आईवडिलांना बोलून दाखवलं होतं. सत्यमची आई रविवारी बाहेरगावी गेली होती. त्याचा मोठा भाऊ शिक्षणासाठी कोल्हापूरला होता. सोमवारी सत्यमच्या घरी कोणीही नव्हतं. तेव्हाच त्याने आत्महत्या केली आहे. दहावीचे पेपर सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Previous Post

ब्रेकिंग | मैत्रिणीवर मारायचे दोघेही ‘लाईन’ ; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने कट केली ‘लाईफलाईन’..!

Next Post

महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

महापालिका आयुक्त सुनील पवारांसह दोन उपायुक्तांची बदली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group