• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘शिवाजी विद्यापीठाच्या खानापुरातील उपकेंद्रासाठी १०० कोटींची तरतूद

Admin by Admin
February 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
‘शिवाजी विद्यापीठाच्या खानापुरातील उपकेंद्रासाठी १०० कोटींची तरतूद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : शिवाजी विद्यापीठाच्या खानापुरातील उपकेंद्रासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजुर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आज (दि.२२) दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक तरतुदीचे आदेश दिले आहेत असंही पाटील यावेळी म्हणाले.

सांगली जिल्हातील अनेक तालुक्यांना गावांना शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा फायदा होणार असल्याचे वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल शिवाय खानापूरसह आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि माण तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल.

यावर अजित पवार यांनी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण तात्काळ शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्यावी व खानापूर येथे हे उपकेंद्र करण्याबाबत कारवाई करा असे निर्देश दिले होते. वैभव पाटील स्वतः सिनेट सदस्य असल्याने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये व विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये (व्यवस्थापन परिषदेत) तसा ठराव मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करून ठराव मंजूर केला होता. तसेच खानापूर येथे जागा निश्चिती ठराव आणि जागेच्या विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉऊन्सिलमध्ये ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर विद्यापीठाच्या पथकाने खानापूर येथे येऊन जागा पाहणीही केली होती. त्यानंतर आज गुरुवारी माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. यावेळी वैभव पाटील यांनी प्रस्तावानुसार उपकेंद्रासाठी १०० कोटीची आर्थिक तरतुदीची मागणी केली. त्या वर उपमुख्यमंत्री पवार यांनी उपकेंद्रासाठी १०० कोटीची आर्थिक तरतूद मंजुरीसाठीचे तात्काळ आदेश दिले आहेत असे सांगत वैभव पाटील यांनी याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध

Next Post

दुःखद बातमी | बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दुःखद बातमी | बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

दुःखद बातमी | बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक हरपला; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group