• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli Breaking |Santosh Kadam Murder Case : संतोष कदम खुनाचे राजकीय कनेक्शन? सांगलीतील नगरसेवकांची चौकशी

Admin by Admin
February 14, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli Crime News : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. या अटकेनंतर संतोष यांच्या हत्येचे काही राजकीय कनेक्शन आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी खूनप्रकरणी सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, बाळू गोंधळेंसह तिघांची इचलकरंजी पोलिस उपअधीक्षक कार्यालय आणि कुरुंदवाड पोलिसांतर्फे दोन तास कसून चौकशी केली.

दरम्यान, चौकशीसाठी त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांचा जबाब नोंदवून घेऊन पुन्हा चौकशीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी हजर राहण्याची नोटीस त्यांना दिली आहे, अशी माहिती सहाय्‍यक निरीक्षक रवीराज फडणीस यांनी दिली.

संतोष कदम यांच्या खूनप्रकरणी त्यांचा पुतण्या प्रफुल्ल कदम याने फिर्याद दिली आहे. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, पप्पू चव्हाण, बाळू गोंधळे, कुशल कुदळे, सिद्धार्थ कुदळे व अन्य तीन ते चार संशयितांनी संतोष कदम यांच्यावर या आधी हल्ला केला होता.

यासाठी 28 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्यावर सांगली पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संतोष कदमला माजी नगरसेवक चव्हाण व अन्य संशयितांविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचे धमकीचे फोन येत असल्याबाबत संतोष कदमने याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार पोलिसांनी माजी नगरसेवक चव्हाण, गोंधळेंसह पाचजणांना मंगळवारी (ता.13) सकाळी दहा वाजता कुरुंदवाड पोलिसांत जबाबासाठी बोलावले होते. दुपारनंतर इचलकरंजी येथील कार्यालयात पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यातर्फेही त्यांची चौकशी करण्यात आली.

9 फेब्रुवारीला कुरुंदवाड नांदणी रोडवर निळ्या रंगाच्या स्विफ्ट कार मध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. एका शेतकऱ्याच्या ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा राजीनामा..! आजच भाजपमध्ये प्रवेश करणार? नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

Next Post

मोठी बातमी ! मनोज जरांगे पुन्हा जिंकले ; ‘या’ दिवशी होणार विशेष अधिवेशन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग न्यूज! मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा खालावली

मोठी बातमी ! मनोज जरांगे पुन्हा जिंकले ; 'या' दिवशी होणार विशेष अधिवेशन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group