• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार, पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या

Admin by Admin
February 3, 2024
in क्राईम
1 min read
0
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार, पोलीस स्टेशनमध्येच झाडल्या गोळ्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उल्हासनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला आहे. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या गोळीबारात दोघे जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिंदे गटाचे तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे. या गोळीबाराच्या घटनेत शिंदे गटाच्या कार्यकर्ता जखमी झाला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादावरुन गोळीबार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यात वाद झाला. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी फायरिंग केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघे जखमी झाले असल्याचं वृत्त आहे.

या गोळीबारात शिवसेनेचे महेश गायकवाड हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे यांच्या गटातील पदाधिकारी आहेत. महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गोष्टींवरुन वाद झाला असल्याचं वृत्त आहे. त्यानंतर ही गोळीबाराची घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा ; पती पत्नीवर गुन्हा दाखल

Next Post

“कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..”, भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..”, भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका

"कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..", भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group