• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली क्राईम अलर्ट | शाळकरी मुलानंतर आता मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यावर भररस्त्यात गोळीबार..!

Admin by Admin
January 31, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाच्या परिसरात रत्नजित विजय पाटील (वय २०, रा.होळीचा टेक, कवलापूर, ता. मिरज) या महाविद्यालयीन तरुणावर अज्ञाताने गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

युवकाच्या दंडात जखम होऊन रक्त येत असल्याने तो तातडीने खासगी रुग्णालयात दाखल झाला. तोपर्यंत त्याला गोळी घुसल्याची कोणतीही कल्पना नव्हती. एक्सरे काढल्यानंतर लहान आकाराची गावठी बंदुकीची गोळी दंडात घुसल्याचे निष्पन्न झाले.

गोळीबार कोणी केला, याबाबत कोणतीच माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकलेली नाही. दरम्यान, याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. सध्या युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरात काल एका शालेय मुलावर हल्ला झाला. त्यानंतर आता महाविद्यालयीन तरुणावर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.

शहरात एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रत्नजित पाटील हा मिरज मेडिकल महाविद्यालयात (Miraj Medical College) पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो दुचाकीवरून जुना बुधगाव रस्तामार्गे सांगलीकडे येत होता. रेल्वे फाटकापुढे आला असता त्याला दंडाला काहीतरी लागल्याचे जाणवले. थोड्या अंतरावर त्याने दुचाकी थांबवून पाहिले असता दंडातून रक्त असल्याचे त्याला दिसले. त्याने मित्राला दंडाला दगड लागला असल्याचे सांगून तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले.

शहरातील एका खासगी रुग्णालयात तो दाखल झाल्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक्सरे काढल्यावर त्यामध्ये दंडात गावठी बंदुकीतून उडालेली लहान गोळी घुसल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी युवकाची विचारपूस केली.

युवकाने पोलिसांना, बंदुकीतून उडालेली गोळी मला लागल्याचे समजले नसल्याची माहिती स्थानिक गुन्हेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. दरम्यान, युवकावर कोणी गोळीबार केला की परिसरात असणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या हातातील बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने युवक जखमी झाला, याबाबत युवकासह पोलिसदेखील अनभिज्ञ आहेत. पोलिस तपासात अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.

Previous Post

दुःखद बातमी | आमदार अनिल बाबर यांचे आकस्मित निधन

Next Post

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group