• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजी | गॅरेज चालकाचा २१ वार करून खून

Admin by Admin
January 8, 2024
in क्राईम
1 min read
0
इचलकरंजी | गॅरेज चालकाचा २१ वार करून खून
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हातकणंगले – इचलकरंजी रस्त्यावरील कोरोची माळावर धारदार शस्त्राने तब्बल 21 वार करून इचलकरंजीतील गॅरेज चालक भरत पांडुरंग येसाळ (वय 36) याचा निर्घृण खून करण्यात आला.

ही घटना गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

इचलकरंजी येथील रेणुका झोपडपट्टी परिसरात भरत येसाळ हा कुटुंबासह राहण्यास होता. तो ट्रकचा मिस्त्री असून त्याचे इचलकरंजीतील भगतसिंग बागेजवळ गॅरेज आहे. शनिवारी रात्री 12 वाजता ट्रक बंद पडला असून दुरुस्तीसाठी या, असा त्याला मोबाईलवर निरोप आला. त्यामुळे भरत दुचाकीवरून हातकणंगलेच्या दिशेने गेला.

दरम्यान, हातकणंगले पोलिसांच्या गस्ती पथकाला शनिवारी मध्यरात्री भरत रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी नातेवाईकांना तत्काळ बोलवून घेतले. श्वानपथक, फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करून तपासाला सुरुवात केली. पहाटे हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

भरत येसाळे याच्या शरीरावर धारदार शस्त्राने 21 वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ, संग्राम पाटील, सुरजित चव्हाण, पोपट भंडारे, महादेव खेडकर, सुहास गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपउपधीक्षक रोहिणी सोळुंके यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. अधिक तपास हातकणंगले पोलिस करीत आहेत.

Previous Post

मिरजेतील रेल्वे पुलाबाबतीत ‘हा’ निर्णय..!

Next Post

माजी नगरसेविकेच्या पुत्राची दहशत; तलवार, एअरगन रोखल्याने दिला चोप

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

माजी नगरसेविकेच्या पुत्राची दहशत; तलवार, एअरगन रोखल्याने दिला चोप

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group