• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये आजपासून किर्तन महोत्सव सोहळा ; शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन – माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती

Admin by Admin
December 13, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमध्ये आजपासून किर्तन महोत्सव सोहळा ; शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन – माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | शहरात भव्य किर्तन महोत्सव सोहळा आजपासून रंगणार आहे. आज ( बुधवार) ते शुक्रवारी १५ डिसेंबर या तीन दिवसीय कालावधीत किर्तन महोत्सव होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिली.

मगदुम यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दरवर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी शहरातील अकुज ड्रीमलँडच्या मैदानावर ‘गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा ‘ कुपवाडकरांना पहायला मिळणार आहे. या कालावधीत महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

यामध्ये युवा महिला कीर्तनकार ह.भ.प. शिवलीलाताई पाटील व युवकवीर कीर्तनकार ह. भ. प ज्ञानेश्वर माऊली पठाडे तसेच पश्चिम महाराष्ट्रात पहील्यांदाच भागवताचार्य पुरुषोत्तम पाटील यांची कीर्तने ऐकायला मिळणार आहेत. यापुर्वी स्व.बाबामहाराज सातारकर, बंडातात्या कराडकर, प्रकाश महाराज साठे,चैतन्य महाराज वाडेकर यांची किर्तने झाली आहेत. कीर्तनाचे संयोजन श्री ग्रंथराज ज्ञानेशवरी पारायण सोहळा समितीकडे आहे.

यासाठी महिला व पुरुष यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सदरची माहिती देताना माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा समितीचे अध्यक्ष शिवगोंडा पाटील, संस्थापक गंगाधर पाटील, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, दादासो पाटील, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, अरुण रुपनर, कल्लाप्पा कोरे,भाऊसाहेब पाटील, गैबी मकानदार, नितीन कारंडे, योगेश हिंगमिरे,कलाप्पा हलींगळे,शिवप्रेमी मंडळ व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. कुपवाडकरांनी या कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन माजी नगरसेवक गजानन मगदुम यांनी केले आहे.

Previous Post

एकदम ओके’च..! सांगोला तालुक्यातील रस्त्यासाठी १७७ कोटी ६० लाख रुपये निधी मंजूर

Next Post

मिरजेत नेत्यांच्या परस्परांवर टीका ; पालकमंत्र्यांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतळ्याचे दहन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत नेत्यांच्या परस्परांवर टीका ; पालकमंत्र्यांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतळ्याचे दहन

मिरजेत नेत्यांच्या परस्परांवर टीका ; पालकमंत्र्यांवरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्याच्या पुतळ्याचे दहन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group