• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | धनगर समाजाने जत -सांगली रस्ता रोखला ; अशोक गोरड यांची प्रकृती खालावली

Admin by Admin
December 1, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | धनगर समाजाने जत -सांगली रस्ता रोखला ; अशोक गोरड यांची प्रकृती खालावली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, तसेच विविध मागण्यांसाठी जत तहसील कार्यालयासमोर उपोषणकर्ते अशोक गोरड हे पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान या उपोषणाला राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुरेश खाडे भेट देऊन उपोषणकर्त्याला राज्य सरकारच्यावतीने आश्वस्त करतील, अशी अपेक्षा होती. पण भेटण्यास पालकमंत्र्यांनी नकार देत उदासीनता दाखवली. त्यानंतर युवकांनी नाराजी व्यक्त करत जत सांगली रोडवर रस्तारोको करत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, आमदार विक्रम सावंत यांनी उपोषण कर्त्याची भेट घेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले. खासदारांनी मात्र उपोषणाकडे पाठ फिरवली असल्याचे आंदोलनस्थळी समाजबांधवांमध्ये चर्चा सुरू होती. आंदोलनस्थळी उपोषणकर्ते अशोक गोरड यांची प्रकृती खालावल्याने यांना सलाईन लावण्यात आली आहे. Dhangar reservation

यावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, धनगर समाजाची अंमलबजावणीची मागणी असताना राज्य सरकारने धनगर समाजाच्या एसटी आरक्षण समावेशाची अभ्यास समिती गठित करून धनगर समाजाची दिशाभूल केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस पाठवण्याची मागणी समाज्याच्या वतीने करण्यात आली.

पाचव्या दिवशी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी सभापती आकराम मासाळ, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, संजय सावंत, आरपीआय नेते संजय कांबळे, सरपंच रमेश साबळे, बंटी दुधाळ, निलेश बामणे आदींनी पाठिंबा दिला. आंदोलनात अशोक बन्नेनवर, विक्रम ढोणे, मारुती सरगर, बाळू पांढरे, प्रवीण गडदे, भाऊसाहेब दुधाळ, किसन टेंगले, शंकर पारेकर, तानाजी कटरे आदींनी सहभागी झाले होते.

Previous Post

मोठी बातमी | जयंत पाटलांच्या कारखान्यावर धडकले स्वाभिमानीचे कार्यकर्ते, ऊस गाळपसाठीच्या गव्हाणीत मारल्या उड्या

Next Post

सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल

सोलापूर : लाखाची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली; फौजदारावर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group