• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जिल्ह्यात खळबळ | भाजप आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश..

Admin by Admin
April 12, 2022
in क्राईम, राजकीय
1 min read
0
जिल्ह्यात खळबळ | भाजप आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीड,खबऱ्या प्रतिनिधी : माजी मंत्री आणि भाजप आमदार सुरेश धस (bjp mla suresh dhas) यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (aurangabad High court ) मोठा दणका दिला आहे.

सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 8 महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम 395 वाढवण्याच्या आदेशाने खळबळ उडाली आहे. यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. 8 महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद माधुरी चौधरी यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी 143, 147, 148, 149, 427, 336 आणि 379 ही कलमे लावली होती. त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

(Poha Recipes : पोहे आवडीनं खाणाऱ्या खास खवय्यांनी या 5 प्रकारचे पोहे बनवून पहा) यात दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे वाढणार आहेत. (पाकिस्तानचं पंतप्रधानपद गेल्यानंतर इम्रान खान यांचं पहिलं Tweet) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्याचा राग मनात धरुन सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला, अशी तक्रार माधुरी यांनी केली. तसंच, 19 जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली, असा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.

Previous Post

संजय राऊत यांचा ६० दिवस तर खडसेंचा फोन ६७ दिवस टॅप…

Next Post

बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणासाठी चौकशी समिती, निलंबित केलेल्यांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शरद पवारांच्या विरुद्ध पुन्हा रान पेटलं,अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणावरून पडळकर, खोत उतरले रस्त्यावर.

बेकायदा दस्त नोंदणी प्रकरणासाठी चौकशी समिती, निलंबित केलेल्यांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group