• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“त्या”च प्रकारचा अजून एक गुन्हा नोंद; दीड लाखांना गंडा घातल्याचे तिसरे प्रकरण..वाचा सविस्तर

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
“त्या”च प्रकारचा अजून एक गुन्हा नोंद; दीड लाखांना गंडा घातल्याचे तिसरे प्रकरण..वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

स्वस्तात सोने देतो म्हणून आणखी एकाची १ लाख ४८ हजार रुपयाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या महिन्याभरातील फसवणूक झालेली ही तिसरी घटना आहे. याबाबत आबासाहेब ज्ञानोबा वाघमोडे (रा.जनावर बाजार, सातारा रोड) यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. फसवणूक केल्याप्रकरणी मेहबूब रमजान शेख (रा. एमआयडीसी ता.जत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणूक ८ आक्टोंबर २०२३ रोजी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोने फसवणूक प्रकरणातील या तिसऱ्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या सर्व घटनांनंतर आता फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यात स्वस्तात सोने देतो म्हणून मेहबूब रमजान शेख (जातगार) यांनी आतापर्यंत तीन जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. कस्टमचे सोने असल्याने टॅक्स वाचतो. त्यामुळे कमी दराने सोने मिळते. असे सांगून अनेक जणांना फसवण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. यात वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची फसवणूक झाली आहे. परंतू सहसा कोणी फिर्याद देण्यास धजावत नाही. मेहबूब शेख यांनी वाघमोडे यांच्याकडून स्वस्तात सोने देतो म्हणून १ लाख ४८हजार रुपये घेतले होते. परंतु सांगितल्याप्रमाणे सोने आणि पैसे परत दिले नाहीत. यानंतर वाघमोडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सोने फसवणूक प्रकरणाचा सुत्रधार मेहबूब शेखवरील गुन्ह्यांमध्ये वाढ

सोने प्रकरणात २६ लाखांची फसवणूक प्रकरण उघडकीस आले. यातील मुख्य सूत्रधार मेहबूब शेख याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अशा प्रकारची फसवणूक झाल्यास जत पोलिसाची संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. याला अनुसरून गेल्या आठवड्यात रेवनाळ येथील एका महिलेने जत पोलिसात मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज (दि. २१) हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. मेहबूब यांनी केलेल्या फसवणुकीत आणखी किती बळी जाणार आहेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहेत.

फसवणुकीची महिन्यातील तिसरी घटना : आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता

२ नोव्हेंबर रोजी स्वस्तात सोने देतो म्हणून एका आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याची साडे सव्वीस लाखाची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पाच जणावर गुन्हे दाखल झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी अशी फसवणूक झालेल्यांनी पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर एका महिलेने मेहबूब शेख यांनी ९ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यानंतर वाघमोडे यांनीही दीड लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. अश्या आणखी घटना तालुक्यात घडलेल्या आहेत याची चर्चा शहरात सुरू आहे.

Previous Post

मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन, मुंबईत मोठा घातपात करण्याची धमकी..

Next Post

सांगलीत “ही” भीती दाखवून सॉफ्टवेअर इंजिनियरला तब्बल २० लाखांचा गंडा..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सांगलीत "ही" भीती दाखवून सॉफ्टवेअर इंजिनियरला तब्बल २० लाखांचा गंडा..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group