• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | गोपीचंद पडळकरांचा भावाच्या गाडीला भीषण अपघात, तातडीने रुग्णालयात हलवले..

Admin by Admin
April 10, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | गोपीचंद पडळकरांचा भावाच्या गाडीला भीषण अपघात, तातडीने रुग्णालयात हलवले..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा : खबऱ्या प्रतिनिधी/ विट्याहून आळसंदकडे येणारी कार आणि आळसंदहून विट्याकडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर धडक झाली. यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद कुंडलिक पडळकर हे गंभीर जखमी झाले.

या अपघातात त्यांच्या कारमधील चंद्रकांत पावणे, हरी पावणे, जगन्नाथ पडळकर, मोहन सर्जे (सर्व रा. पडळकरवाडी, विभूतवाडी, ता. आटपाडी) या चार कार्यकर्त्यांसह टेम्पो चालक राहुल भीमराव सुर्वे (रा. खंबाळे-भा.) असे अन्य पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास खंबाळे ते आळसंद रस्त्यावर विराज साखर कारखान्यासमोर झाला. ब्रह्मानंद पडळकर हे कार्यकर्त्यांसह आळसंद येथील मंगल कार्यालयात खंबाळे येथील एका कार्यकर्त्याच्या बहिणीच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी त्यांच्या गाडीतून निघाले होते. त्यावेळी आळसंदहून विट्याकडे येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोरून जोराची धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांचे हात व पाय फॅक्चर होऊन गंभीर झाले आहेत. तसेच टेम्पो चालक राहुल सुर्वे यालाही गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमींना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून याप्रकरणी टेम्पो चालक राहुल सुर्वे याच्याविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा फरार, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

Next Post

वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून १ ठार, २जण जखमी…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून १ ठार, २जण जखमी…

वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून १ ठार, २जण जखमी...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group